वारणानगर/ प्रतिनिधी :
येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये युवा कलाविष्कार :२०२३ उत्साहात आणि जल्लोषी वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्रातील लोकपरंपरा, भारतीय आणि पाश्चात्य संगीत, नृत्य, सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या विषयावर एकांकिका, मार्मिक शेलापागोटे सादर करून विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. जवळपास १६५ हून अधिक विद्यार्थी कलाकारांनी आपल्या कला सादर केल्या. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे- सावकर, प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी सांस्कृतिक समारंभासाठी प्रेरणा देऊन शुभेच्छा ही दिल्या. संयोजक प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी छत्तीसगढ -दंतेवाडा येथील नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या ११ जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
विशेष आनंदाची बाब म्हणजे समारंभाचे प्रारंभीच प्राचार्य चिकुर्डेकर यांनी संस्थेचे अध्यक्ष आणि वारणा समूहाचे नेते आमदार डॉ. विनय कोरे सावकर यांना "लोकमत ऑफ द इयर", पुरस्काराने सन्मानित केल्याची घोषणा केल्यानंतर तरुणांनी टाळ्यांच्या गजरात एकच जल्लोष केला.
![]() |
कार्यक्रमाचा शुभारंभी श्रावणी बुरांडे या विद्यार्थिनीने भगवान श्रीराम स्तुती स्रोतावर शास्त्रीय नृत्य सादर केले. वैष्णवी चव्हाण, शुभम खवरे यांनी जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराज साकारून "स्वराज्य स्थापना", विषयावरील लघु नाट्य सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. धैर्यशील नायकवडी, स्नेहा आणि सहकारी, श्रावणी काळे, सेजल पाटील, पार्वती कामी, नाझिया मुल्ला, सोनाक्षी लुगडे, साक्षी मुडळे व प्रगती खोत, चैत्राली पवार ,स्नेहल कांबळे, आयुष वाडकर, भाग्यश्री पाटील, मानसी पाटील, आकांक्षा पाटील, श्रावणी काळे, अपूर्वा गिरी, स्नेहा कांबळे, भक्ती जबडे अमृता वाडेकर यांनी सादर केलेल्या पारंपारिक, पाश्चात्य, गीतांनी कार्यक्रमात बहारदार पण आणला. रॅप सॉंग, लावणी, भक्ती गीते, देवीची गीते, वाद्य, रिमिक्स डीजे सॉंग, महाराष्ट्रीयन, राजस्थानी गाण्यावरील नृत्याने तरुणांईंची मने जिंकली. तीन हजार हून अधिक विद्यार्थी- विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमाचा शुभारंभ प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी नटराज मूर्ती पूजन करून झाला. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आर. बी. पाटील, डॉ. प्रीती शिंदे पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक केले. नॅक समन्वयक डॉ. एस. एस. खोत, डॉ. संतोष जांभळे, डॉ आर. बी. भुसनर, प्रा.अण्णासो पाटील, प्रा. नामदेव चोपडे, प्रा. अंकुश कुरणे, प्रा.सौ. शिल्पा पाटील, प्रबंधक बाळासाहेब लाडगावकर, भालचंद्र शेटे यांच्यासह प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
अध्यक्षीय समारोपात बोलताना प्राचार्य डॉ. चिकुर्डेकर म्हणाले की, संस्कारित कलाकार महाविद्यालयातून घडावेत. भारतीय संस्कृती, संस्कार, परंपरा जपण्यासाठी तरुणाई मध्ये जबरदस्त शक्ती आहे. अल्पावधीत सराव करून प्रभारी सादरीकरण केल्याबद्दल कलाकार विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. डॉ. आर. बी. बसनाईक यांनी आभार मानले.
हे हि वाचा :
🔴 आता जमीन एन.ए (अकृषिक जमीन) ची गरज नाही ?/N-A_Non Agricultural Land
🔴 गतीशील विचारांचा कृतीशील नेता आमदार डॉ. विनय विलासराव कोरे (सावकर) | Biography | of Dr. Vinay Vilasrao Kore (Savkar)