महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना | Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2022 |

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना |Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2022|

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना |Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2022|

या योजने अंतर्गत महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील सुशिक्षित बेरोजगार  युवकांना आर्थिक सहाय्य सन २०२० पासून करत आहे. या योजने अंतर्गत बेरोजगार युवकांना प्रति महीने ५०००/- रूपयांची आर्थिक मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात महाराष्ट्र शासन मार्फत जमा करण्यात येते. महाराष्ट्र शासन मार्फत करण्यात येणारी ही मदत बेरोजगार युवकाला एखादी नोकरी मिळत नाही तो पर्यंत त्यांना बेरोजगारी भत्ता देण्यात येतो त्यामुळे सदर बेरोजगारी युवक आत्मनिर्भर बनतो या बेरोजगार भत्त्यामुळे युवकांचा दैनंदिन खर्च सदर भत्त्यातून करणे सोपे जाते आणि जीवनमान सुधारणेस मदत होते. महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचा मुख्य उद्देश बेरोजगार युवकांना आर्थिक मदत करणे हाच आहे.   

🔰 महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेसाठी लागणारी पात्रता : -

१. अर्जदार युवक बेरोजगार असावा.

२. अर्ज करणारा युवक कमीत-कमी इयत्ता १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

३. अर्ज करणाऱ्या युवक चे वय २० वर्ष ते ३५ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.

४. अर्ज करणाऱ्या युवकाचे नाव Employment Office मध्ये रजिस्टर असणे आवश्यक आहे.

५. अर्ज करणाऱ्या युवकाचे उत्पन्नाचे साधन इतर कोणते ही असू नये.

६. अर्ज करणाऱ्या युवकांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाखाच्या वर नसावे.

७. अर्ज करणारा युवक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

🔰 महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेसाठी कागदपत्रे -

१. बेरोजगार युवकाचे मतदान ओळखपत्र

२. बेरोजगार युवकाचे आधारकार्ड.

३. बेरोजगार युवकाचे पॅन कार्ड

४. बेरोजगार युवकाचे किमान १२ वी उत्तीर्ण प्रमाणपत्र.

५. बेरोजगार युवकाचा शाळा सोडल्याचा दाखला.

६. बेरोजगार युवक हा १५ वर्ष महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे बंधकारक.

७. बेरोजगार युवकाचे जन्म प्रमाणपत्र.

८. बेरोजगार युवकाच्या कुटुंबाचा वार्षिक तीन लाखाच्या आत उत्पन्नाचा दाखला.

९. बेरोजगार युवकाचा पासपोर्ट साईज फोटो.

१०. बेरोजगार युवकाच्या संपर्कासाठी मोबाईल क्रमांकई-मेल.

११. बेरोजगार युवकाचा कोर्स किंवा  डिग्री पूर्ण केलाचे प्रमाणपत्र आढळल्यास संबधित युवकाचा अर्ज रद्द करण्यात 

येतो.  

🔰 महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कुठे करावा

महाराष्ट्र बेरोजगार योजनेसाठी www.rojgar.mahaswayam.in या अधिकृत वेबसाईट वरती अर्ज करावा.   

  🔰 महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेसाठी ऑनलाईन कसा भरायचा  

सर्वप्रथम mobile मध्ये Chrome app मध्ये जाऊन mobile ची desktop site करायची आहे त्यांनतर Chrome मध्ये अर्जदाराला महाराष्ट्र शासनाच्या www.rojgar.mahaswayam.in अधिकृत सर्च करावी लागेल त्यांनतर आपणा समोर महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटच्या Home Page ओपन होईल अर्जदाराला ने त्या पेजवर  लॉग-इन करायचे आहे.  🔴माहितीचा अधिकार अधिनियम, २००५

आता आपल्यासमोर एक नवीन Page ओपन होईल त्यात अर्जदाराचे नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव, लिंग, मोबाईल क्रमांक, ई-मेल इत्यादी माहिती भरायची आहे. ही माहिती भरून झाले वर Next या पर्यायावर क्लिक करायचं आहे.त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येईल तो त्या पर्याय रखान्यामध्ये भरून Submit पर्यायावर क्लिक करायचे आहे.त्यानंतर आपला अर्ज भरून पूर्ण होईल.

👉अधिक माहितीसाठी :

संपर्क क्रमांक : 022-22625651/53

Email ID: helpdesk@sded[dot]in 

 Promoted Content : 

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post