रिलायन्स फौंडेशन व पशुसंवर्धन विभाग यवतमाळ मार्फत पुरग्रस्त भागामध्ये पशु उपचार शिबिरांचे आयोजन...

 

रिलायन्स फाउंडेशन :

रिलायन्स फाउंडेशन, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ राळेगाव तसेच तहसील विभाग राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 29 जुलै 2022 रोजी झाडगाव व रावेरी या पूर परिस्थिती उद्भवलेल्या गावांमध्ये पशु चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्प दरम्यान दोन्ही गावातील जनावरांना लसीकरण, गर्भ तपासणी, औषधोपचार, वंध्यत्व तपासणी व निवारण, खच्चीकरण, जंत व गोचीड निर्मूलन, खनिज मिश्रण वाटप, जनावरांचे टॅगिंग,शल्यक्रिया इत्यादी बाबीवर कार्यक्रमादरम्यान भर देण्यात आला. यावेळी दोन्ही गावातील 333 जनावरावर उपचार करण्यात आले. यामध्ये गाई 86, बैल 78 ,महेश 9, शेळ्या 160, या दरम्यान प्रमुख उपस्थिती डॉ. मोहन गोत्रे, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन विभाग यवतमाळ, डॉ. प्रशांत झाडे, पशुधन विकास अधिकारी -विस्तार, डॉ. रणजीत नाळे, पशुधन विकास अधिकारी राळेगाव,  डॉ. सचिन मेश्राम पशुधन पर्यवेक्षक, डॉ. एन बी नवरे पशुधन पर्यवेक्षक,  वर्षा गोंडासे - पशुधन पर्यवेक्षक,  के एस भोरे परिचर, मनीष खेडकर परिचर, नयन कोकाटे, समीर जमनाके,  रुपेश मेश्राम, प्रकाश भेदुरकर, कानकेश्वर शेंडे,  मयूर जीवतोडे, सौरभ भोरे, फार्म्स पेंदाम, तसेच रावेरी येथील सरपंच श्री राजेंद्र तेलंगे, गजानन झोटिंग उपसरपंच रावेरी तसेच रिलायन्स फाउंडेशनचे श्री प्रफुल बनसोड, श्री तेजस डोंगरीकर जिल्हा व्यवस्थापक तसेच श्री अमोल श्रीरामे श्री शेखर कडू रिलायन्स फाउंडेशन सहकारी तसेच ऋतुजा मेश्राम यांचे यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रमाचे परास्ताविकआयोजन उत्कृष्टरीत्या करण्यात आले. तसेच उमेद प्रकल्पातील कृषी सखी व पशु सखी, युवा वेध  मंच संस्था राळेगाव यांनी सुद्धा या कार्यक्रमांमध्ये सहकार्य केले.




 Promoted Content : 

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post