श्री. प्रकाश जमधडे. एक आदर्श व्यक्तिमत्व...

https://www.facebook.com/prakash.jamdhade

 प्रकाश जमधडे- एक आदर्श व्यक्तीमत्व हर हुन्नरी व्यक्तीमत्व, कष्टाळू स्वभाव वृत्ती, शून्यातून विश्व निर्माण करण्याची अंगी गती. 
सदैव मुखी असे आपुलकीची वाणी, आपल्या कामांशी एकनिष्ठता बाळगणारी व्यक्ती.

https://www.socialmediaaanibarachkahi.com/
प्रकृती पंचकर्म वेनलेस सेंटर, कोडोली.

तमसो मा जोतिर्गमय या उक्तीला सार्थ ठरवणारे एकमेव व्यक्तीमत्व मा. श्री प्रकाश जमधडे. अनेक संघर्षांचा सामना करत अंधारातून प्रखर तेजस्वी सूर्याप्रमाणे आपल्या कार्यकर्तृत्वाचा प्रकाश दाही दिशां पर्यंत पसरवणारे समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व.

आज आपण त्यांना ड्रीम्स सोसायटीचे चेअरमन अथवा होतकरू उद्योजक तसेच राजकारण आणि समाजकारण ह्या दोन्ही क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे व्यक्तीमत्व म्हणून ओळखतो. 

प्रकाश जमधडे यांचा जन्म वाघोली येथे २५ डिसेंबर १९८३ रोजी झाला. लहानपणी शालेय जीवनात असताना त्यांनी वर्गातील वर्ग प्रमुख, कबड्डी, खो-खो, क्रिकेट संघाचे कर्णधार पद यांचे नेतृत्व त्यांनी केलेले आहे. तसेच, वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला होता. याचबरोबर शाळेत गायलेल्या गाण्यांमुळे ५ वर्षे ते पुढील ५ वर्षे शिक्षण घेत असताना आवडता विद्यार्थी होण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्या कारणाने त्यांना १२ वी नंतर मध्येच शिक्षण सोडावे लागले. या दरम्यानच्या काळात त्यांनी अहमदनगर येथील एमआयडीसीत खाजगी नोकरी केली. ३ वर्षानंतर त्यांनी कॉलेज मध्ये प्रवेश घेऊन मानसशास्त्र विषयात पदवी मिळवली. 

नंतर पुढे एका बांधकाम व्यावसायिकाकडे सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्रात  सुमारे १२ वर्षे काम केले. ह्या क्षेत्रात काम करत असताना ह्या क्षेत्राचा उत्कृष्ट अनुभव त्यांना मिळाला. आपल्या कडे असणाऱ्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी २०२० साली 'ड्रीम्स होम सर्व्हिसेस' या नावाने स्वतः ची कंपनी सुरू केली. या कंपनीद्वारे त्यांनी ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातलं घर योग्य दरात उपलब्ध करून देण्याचा निर्धार केला. यातून अनेक तरूणांना प्रशिक्षण दिले तर जवळपास १० तरूणांना  रोजगार उपलब्ध करून देत रिअल इस्टेट क्षेत्रात आपला ठसा उमटवला. 

२०१३ साली स्थापन झालेल्या ड्रीम्स संकल्प को-ऑपरेटीव्ह  हौसिंग सोसायटीच्या लोकांनी त्यांना २ वेळा बिनविरोध चेअरमनपदी निवड केली. सोसायटीतील समस्यांचे निवारण त्यांनी वेळोवेळी केले. लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांच्या पत्नीने वाघोली ग्रामपंचायतीची निवडणूकही लढवली. 

समाजकार्य करण्याची इच्छा असल्याने त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आपल्या आई-वडिलांसह हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना ते आपले आदर्श मानतात, त्यांचा आदर्श घेत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हवेली तालुका विभाग अध्यक्ष या पदावर काम केले. राजकारणात काम करत असताना अनेक सामाजिक प्रश्नांबाबत आंदोलनात आवर्जून सहभाग नोंदवला. यापुढे त्यांनी अनेक आंदोलने समाजकार्यासाठी केलीत.वाढीव वीजबील, पथदिवे, रस्त्याच्या समस्या, कोरोना काळात दवाखान्यांचे अवाजवी बील कमी करून देणे, खाजगी शाळांमध्ये आकारली जाणारी मनमानी फी स्थानिकांच्या नोकरीचा प्रश्न, गँसदरवाढीबाबत आंदोलन, अशी अनेक कामे पार पाडलीत. 

https://www.socialmediaaanibarachkahi.com/महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे काम करत असताना पक्षाच्या सभा, बैठका, आंदोलने यात ते नेहमीच अग्रेसर असतात. यात त्यांना पोलिसांच्या अनेक नोटिसांचा सामना करावा करावा लागला. त्यांना पञकारितेची आवड असून ते पञकारांचा सन्मानही करतात. त्यांचे अनेक लेख वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहेत. पत्रकार या चौथ्या स्तंभाने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सरकार समोर मांडून ते प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहतात. नुकतेच वाघोली गाव पुणे महानगरपालिकेत समाविष्ठ झाले आहेत. रस्ते, वाहतूक-व्यवस्था , वीज, पाणी, घनकचरा व्यवस्थापन, ड्रेनेज लाईन, शिक्षण, आरोग्य या मूलभूत सामाजिक समस्यांवर काम होत  नसल्याने सर्व विचारांच्या वाघोलीकरांसाठी स्थानिक आणि सोसायटीधारक या सर्वांना विचारात घेऊन 'वाघोली बचाव' अशी एक कृती संघटना स्थापन करणार आहोत या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुणे महानगरपालिकेची  येणारी निवडणूक लढवण्याचा त्यांचा मानस आहे. आपण या भागातून नगरसेवक म्हणून निवडून आलो तर येथील नागरी प्रश्न पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या द्वारे सोडवू शकतो असा आशावाद त्यांना आहे, येणाऱ्या काळात सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षासाठी व सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडविण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील आणि तत्पर राहणार आहेत. 

समाजासाठी सदैव कार्यशील राहणाऱ्या कार्यकर्तृत्वाला सलाम....!

आदर्श वस्त्रम, अमृतनगर 

  promoted content : 

●   आपल्या व्यवसायाचे   product/services online selling     कसे करावे.

●  श्री. प्रकाश सूर्यवंशी. संस्थापक अध्यक्ष ए.एस् .के. फौंडेशन, काखे.

●   श्री. सुनील एकनाथ पाटील. आष्टा (अध्यक्ष : ग्रुप ऑफ मीडिया, समूह प्रमुख : स्वराज्य मराठी न्यूज चॅनेल)

●   गरूड भरारी उगवता तारा सुनील आनंदा नवाळे.

● समाजकार्यातील दीपस्तंभ संजू मिस्त्री साळशीकर.

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post