Header Add

कोरे महिला महाविद्यालयात स्वराज महोत्सव सुरु

Smt. Shobhatai Kore Warana Mahila Mahavidyalaya, Yelur

श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालय, येलूर ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर

प्रकृती पंचकर्म वेनलेस सेंटर, कोडोली 

शाहुवाडी / प्रतिनिधी :

आपल्या देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीला 75 वर्षे पूर्तीनिम्मित देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.  शाळा - महाविद्यालय स्तरावर दि. 9 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत स्वराज महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. कोरे महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत मंगळवारी क्रांती दिनी शाखा समन्वयक प्रा. डी. एस. पोवार यांच्या अध्यक्षतेखाली व प्रभारी प्राचार्य प्रा. आर. एस. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वराज्य महोत्सवाचे उदघाटन उत्साहात करण्यात आले. महाविद्यालयात विद्यार्थिनी, प्राध्यापक-प्राध्यापिका, कार्यालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा तर बुधवारी महाविद्यालयीन परिसर स्वच्छतेचा व प्रबोधनपर व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. गुरुवारी रक्तदान, नेत्रदान व देहदान प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मलकापूर ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक श्री. के. जी. चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. स्वराज्य महोत्सवात विद्यार्थिनींचा सहभाग उत्स्फूर्त स्वरूपाचा असून यापुढे देखील प्रत्येक दिवशी व्याख्यान, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून स्वराज्य महोत्सव उत्साहात साजरा केला जाणार असल्याचे शाखा समन्वयक प्रा. डी. एस. पोवार यांनी सांगितले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी प्रा. एस. डी. मोहिते, प्रा. एम. जी. पाटील, प्रा. विभूते, प्रा. बंडगर व इतर प्राध्यापक-प्राध्यापिका तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होता.



 Promoted Content : 

Post a Comment

0 Comments