समाजकार्यातील दीपस्तंभ संजू मिस्त्री साळशीकर

समाजकार्यातील दीपस्तंभ संजू मिस्त्री साळशीकर...

सामाजिक कार्याची आवड असली की कोणतेही अडथळे ते कार्य तडीस जाण्यापासून रोखू शकत नाहीत याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्री.संजय शामराव पाटील (साळशीकर)..बांबवडे  पंचक्रोशीत 'संजू मिस्त्री साळशीकर' या नावाने प्रसिद्ध असलेल्या संजयरावांनी अनेक सामाजिक कार्ये करत सर्वांपुढेच आदर्श निर्माण केला आहे..सामाजिक कार्याबद्दल त्यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितलं की "लहानपणी घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे गरिबी जवळून माहिती होती.त्यामुळे त्यांना सुरुवातीपासूनच गरिबांची कणव होती..कोल्हापूर येथे आय.टी.आय.मध्ये मोटर मेकॅनिक कोर्स करून बांबवडे येथे 1999 साली स्वतःचे दोस्ती मोटर गॅरेज सुरू केले व 2000 साली गोरगरिबांच्या मुलांना वह्यापुस्तके वाटून सामाजिक कार्याची सुरुवात केली.नंतर समाजातील सर्व गरजूंना ओळखून हवी ती मदत केली.."

संजू मिस्त्रींच्या सामाजिक कार्याबद्दल जाणून घेत असता असे लक्षात आले की त्यांच्या कार्याला वेगवेगळे पैलू आहेत.त्यापैकी त्यांनी कायम निरपेक्षपणे वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना मदत केली आहे.तसेच पोलीस मित्र असो, अपघातग्रस्तांना तात्काळ मदत असो वा पर्यावरणपूरक कोणतेही कार्य असो ते कायम अग्रेसर असतात.संजू मिस्त्री धार्मिक क्षेत्रात व गडकिल्ले संवर्धनात कधीही कमी पडत नाहीत.कोरोना महामारी दरम्यान कोरोना योध्याना त्यांनी धान्य स्वरूपात मदत केली आहे तसेच त्यांची चहा नाश्त्याची सोय करत माणुसकीचे दर्शन घडवले आहे.विशेष म्हणजे त्यासाठी त्यांना कोणतीही शासकीय मदत मिळत नाही. हे सगळं ते स्वखर्चाने करतात.

आपल्या अंगीची कला जोपासत त्यांनी समाजप्रबोधनाचे ही कार्य केले आहे.त्यामध्ये कोरोना काळातील 'घरी रहा, सुरक्षित राहा' या संदेशासाठी त्यांनी 'यमा'ची वेशभूषा करून प्रबोधन केले आहे तसेच ते गावातील पारायण सोहळ्यावेळी त्यांनी 'विठ्ठला'ची वेशभूषा धारण करून सलग 2 तास एकसारखे विटेवर उभे राहिले आहेत.मराठा मूक क्रांती मोर्चावेळी त्यांनी 'छ.शिवाजी महाराजांची वेशभूषा' तसेच प्रत्येक वर्षी 'वासुदेवा'ची वेशभूषा करत ते प्रबोधन करत असतात.मिस्त्रींच्या कलेची अनेक दूरचित्रवाहिनीनी दखल घेत त्यांना पडद्यावर आणले आहे.त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत अनेक संघटनांनी त्यांना वेगवेगळी पदे देऊ केली आहेत.त्यामध्ये मानवाधिकार संघटनाचे शाहूवाडी तालुकाध्यक्ष पद,मराठा महासंघ (आबासाहेब पाटील)चे तालुका उपाध्यक्षपद व आपुलकी फौंडेशन कोल्हापूरचे जिल्हा उपाध्यक्षपद यांचा समावेश आहे.

संजू मिस्त्रीना ते करत असलेल्या कार्याची पोचपावती म्हणून अनेक पुरस्कारांनी  सन्मानित करण्यात आले आहे तसेच विविध प्रकारच्या स्पर्धांत भाग घेऊन त्यांनी अनेक बक्षिसे जिंकली आहेत. अगदी निस्वार्थी भावनेने आजवर अविरत सामाजिक कार्य करत असलेल्या मिस्त्रींना सलाम.                                                                     

                                                                                                                                         - उद्देश पाटील. (दिगवडे)                                              



 Promoted Content : 

🔴  वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते || सहकार महर्षि स्वर्गीय तात्यासाहेब कोरे. ||

🔴  हरित क्रांतीचे प्रणेते कै.श्री. बापूसाहेब जमदाडे (तात्या). माले 

🔴 गरूड भरारी उगवता तारा : सुनील आनंदा नवाळे. (वाडीरत्नागिरी) 

🔴 अरविंद आनंदराव पाटील. (प्रथम-लोकनियुक्त  सरपंच  जुने-पारगाव) 

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post