गरूड भरारी उगवता तारा : सुनील आनंदा नवाळे. !!!
श्री. सुनील आनंदा नवाळे. |
आदरणीय
सुनील नवाळे साहेब यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्यकर्तृत्वाचा आढावा आज आपण Social Media Aani Barach Kahi च्या माध्यमातून घेत आहोत.
सुनीलजींचा जन्म दख्खनच्या राजांचे अस्तित्व असणाऱ्या ठिकाणी अर्थातच वाडी रत्नागिरी या तीर्थक्षेत्रात झाला. जन्मतः जोतिबा रायांची त्यांच्या भाविक भक्तांची सेवा करण्याची संधी व प्रेरणा त्यांना लाभली. सुनीलजींनी सामाजिक कार्याचा विडा उचलला स्वच्छ आणि समृद्ध गाव करण्यासाठी त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा केली. कर्पूरेश्र्वर मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरातील असलेली अस्वच्छता त्यांना असह्य करत होती. तो अस्वच्छतेचा अंधार नष्ट करण्याचा त्यांनी निर्धार केला. गावातील तरुण पिढीला स्वच्छतेचे आव्हाहन केले.स्वतः हातात झाडू घेतला बघता बघता कर्पूरेश्र्वर मंदिराचा परिसर स्वच्छतेने नटला. कर्पूरेश्र्वराच्या नावाने साहेबांनी दूधसंस्था स्थापन केली. अशा पद्धतीने विविध क्षेञांत सुनीलजी आपली जनसेवा प्रामाणिकपणे बजावत राहिले.
सहाजिकच त्यांच्या ह्या समाजकल्याण्याने प्रेरित होऊन अनेक तरुण व ज्येष्ठ मंडळींनी त्यांना राजकारणात उतरण्याचा आग्रह धरला आणि सुनीलजींच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. काही काळ एका राजकीय गटामध्ये कार्यरत असूनही ऐन निवडणुकीच्या तोंडावर वरिष्ठांनी सुनीलजींची उमेदवारी नाकारली सहाजिकच सुनील साहेबांना आदर्श मानणारा गट नाराज झाला, नाराज झाला खरा, परंतु तो स्वस्थ बसला नाही गर्जून उठला. अखेर सामान्य माणसांची इच्छा वरिष्ठांना नाकारता आली नाही. त्यांच्या गटाला तिकिटही मिळाले आणि विजयाची माळ त्यांच्या गळ्यात पडली तो विजय म्हणजे साहेबांनी अहोरात्र कष्ट केलेल्या कामाची जणू जनतेने दिलेली पोहोचपावतीच. मिडिया पावर लाईव्ह या युट्युब चॅनेलचे सर्वेसर्वा सुहास पाटील यांनी मुलाखतीदरम्यान सुनीलजींना त्यांच्या कामांचे रहस्य काय? हा प्रश्न विचारला असता त्यांना उत्तर देताना म्हणतात, कोणताही मनुष्य लहान असू दे अगर मोठा माझ्या गटाचा असूदे अगर विरूद्ध गटाचा त्याच काम पूर्णत्वास नेणं हा माझा धर्म आहे. त्याचं काम केल्यानंतर मिळणारं आत्मिक समाधान मी शब्दातही व्यक्त करू शकत नाही.
"गरूड भरारी उगवता तारा: सुनील आनंदा नवाळे." |Biography| Sunil Ananda Navale.
आपल्या कामाला संस्थात्मक आधाराची जोड देण्याकरिता साहेबांनी जोतिबा सोशल फौंडेशनची स्थापना केली. आज फौंडेशनचे अध्यक्ष , उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्यांची मदत घेऊन ग्रामीण पातळीवर आपल्या कामांचा ठसा उमटवत आहेत. प्लास्टिक मुक्त तीर्थक्षेत्र करण्याचा त्यांनी निश्चय केला आणि त्याकरिता ते नागरिकांना, व्यापारांना स्वच्छतेचे व प्लास्टिक न वापरण्याचे महत्त्व पटवून देत आहेत तर आठवड्याला जोतिबा दर्शनासाठी एक ते दीड लाख भक्तगण येतात परिणामी मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. त्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्याकरीता ग्रामपंचायतीकडे मनुष्यबळ अपुरे होते. साहेबांनी गावातील तरुण मंडळांना स्वच्छता मिशनमध्ये राजकारण विसरून सामील होण्यासाठी विनंती व आव्हानही केले. भक्तांना पुरणपोळीच्या नैवेद्याने तृप्त करणाऱ्या महिलांचे ते मनोभावे आभार व्यक्त करतात.
वाडी रत्नागिरी येथे १९९० ला नवीन वसाहत स्थापन झाली पण तब्बल ३० वर्षे तेथील सिटी सर्व्हे सातबाऱ्याचे काम धूळ खात पडले होते. ३०९ प्लॉट शासनाने दिले होते त्यातील १५१ प्लॉटच्या सातबाऱ्याचे काम जोतिबा फौंडेशनच्या मदतीने साहेबांनी मार्गी लावले. येत्या ५ वर्षात आपणास कोणकोणती कामे पार पाडावयाची आहेत हे सांगताना साहेब म्हणतात, रस्ते, गटारी यांची कामे सुरू आहेत. पार्किंग आणि प्रशस्त मैदानाचे काम आपण येत्या ५ वर्षांत मार्गी लावू असे आश्वासन ते नागरिकांना देतात. ब गटात असणारे हे तिर्थक्षेत्र अ गटात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा संकल्प सुनीलजींनी केला आहे. गावातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेत. साहेबांनी रक्तदान शिबीरे ही आयोजित केली. त्यांच्या सर्वच कार्याची दखल घेत तत्कालीन कोल्हापूर जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर देशमुख साहेबांनी त्यांचा यथोचित सन्मान केला आहे. अशा ह्या कार्यसम्राटाला भावी वाटचालीस अनंत शुभेच्छा तुमच्याकडून असचं समाजप्रबोधनाचं कार्य घडत राहो.