तळसंदे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी महेश कुंभार यांची निवड.

महेश शिवाजीराव कुंभार. नुतन उपसरपंच तळसंदे ग्रामपंचायत

"तळसंदे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी महेश कुंभार यांची निवड."

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील महत्त्वाची समजली जाणाऱ्या तळसंदे गावातील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ सावित्री चव्हाण यांनी राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पद रिक्त झालेल्या पदावर श्री महेश शिवाजीराव कुंभार यांची बहुमताने उपसरपंच पदी निवड करण्यात आली. 

अशी माहिती निवडणूक अधिकारी लोकनियुक्त सरपंच श्री अमरसिंह रंगराव पाटील यांनी माहिती दिली. सरपंच अमरसिंह  पाटील यांनी निवडणूक अधिकारी म्हणून  काम पाहिले. याप्रसंगी तळसंदे ग्रामपंचायतीचे सर्वग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. निवडणूक झाल्यानंतर उपस्थित ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी श्री महेश कुंभार यांचे अभिनंदन करत  पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


  Promoted   Content   :   

● जाखलेच्या आजीने भर माळरानावरच अडविली आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांची गाडी..

● गरुड भरारी उगवता तारा : सुनील आनंदा नवाळे


Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post