यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आणि सामाजिक न्याय दिन मोठ्या उत्साहात साजरा....

Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya warananagar

वारणानगर (प्रतिनिधी) : वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आणि सामाजिक न्याय दिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे- सावकर प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.

राजर्षी शाहू महाराज यांच्या अर्धपुतळ्याला प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ग्रंथालयामध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित दुर्मिळ ७० हून अधिक ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आले. दिवसभरात ५०० हून अधिक अभ्यासक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापकांनी, प्रदर्शनाला भेट दिली. एकूण तीन दिवस प्रदर्शन सर्वांसाठी खुले ठेवण्यात येणार असून, याचबरोबर महाविद्यालयामध्ये सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांच्या साठी शिष्यवृत्ती फॉर्म भरून देण्याची व्यवस्था या निमित्ताने करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेचे डॉ. एस. एस. खोत, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. सी. आर. जाधव, क्रीडा संचालक आण्‍णासो पाटिल, इतिहास विभाग प्रमुख प्रा. यु. जी. जांभोरे उपस्थित होते. ग्रंथालया मध्ये आयोजित ग्रंथ प्रदर्शनामध्ये सहाय्यक ग्रंथपाल डॉ. संदीप जाधव यांनी प्रदर्शनासाठी सहाय्य केले. यावेळी डॉ. पी. एस. राऊत, डॉ. एस एस जाधव, डॉ. डी. आर. धेडे, डॉ. बी.के. वानोळे, डॉ. ए. आर. भूसणर, प्रा. डी.ए.खोत उपस्थित होते.  अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिया कशी असते. Engineering Diploma Admission Process ?

YC Warana Mahavidyalaya, Warananagar, Warananagar, Maharashtra 416113


 promoted content :

●  बहिरेवाडी ता. पन्हाळा येथे  उज्वला गॅस वाटप, बांधकाम कामगारांना पेटी वाटप व शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या...

●   आय.टी.आय क्षेत्रात करिअर केल्यावर मिळेल चांगल्या पगाराची नोकरी...

●  वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या   34 विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये निवड...

●   आपल्या व्यवसायाचे   product/services online selling    कसे करावे.

● ॲग्रो टुरिझम ला साथ आधुनिकतेची गगनबावडा तालुका आता दिसणार इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनच्या नकाशावर...

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post