ॲग्रो टुरिझम ला साथ आधुनिकतेची गगनबावडा तालुका आता दिसणार इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनच्या नकाशावर...


कोल्हापूर (प्रतिनिधी) : पर्यटन संचालनालय ,महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त अनाबेला अग्रो टुरिझम, गगनबावडा मोरे मालक शेती फार्म मध्ये नुकतेच इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात आले. 
वाढत्या पर्यटकांच्या मागणीवरून तसेच इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन आलेल्या पर्यटकांना वाहन चार्जिंग करणे सोपे जावे. तसेच मुंबई, पुणे, गोवा व कोंकण  सफारी करणाऱ्या पर्यटकांना आता गगनबावडा मध्ये मुक्काम करून स्वतःचे वाहन पूर्ण चार्ज करुन पुढे प्रवासास जाता येणार आहे.

तसेच अनबेला कृषी पर्यटन मधले हे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन गगनबावडा तालुक्यातील पहिलेच चार्जिंग स्टेशन सुरू झाले आहे. याचा महामार्गावरून जाणाऱ्या पर्यटकांना लाभ होणार आहे असे मोरे मालक शेती फार्म चे अजिंक्य मोरे यांनी सांगितले. 

सदर कृषी पर्यटन स्थळी २ चार्जिंग स्टेशन २४ तास सुरू असणार आहेत.

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post