लोकनेते विष्णूपंत बच्चे (आण्णा) यूथ फौंडेशनचे सचिव मा.आकाश बर्गे-पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा.

 

लोकनेते विष्णूपंत बच्चे (आण्णा) यूथ फौंडेशनचे सचिव मा.आकाश बर्गे-पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

लोकनेते विष्णूपंत बच्चे (आण्णा) यूथ फौंडेशनचे सचिव मा.आकाश बर्गे-पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा...

पन्हाळा (प्रतिनिधी) : बच्चे सावर्डे येथील सामाजिक कार्यकर्ते, लोकनेते विष्णूपंत बच्चे (आण्णा) यूथ फौंडेशनचे सचिव व आकाश बर्गे-पाटील & असोसिएट्स चे सर्वेसर्वा मा.आकाश बर्गे-पाटील यांचा वाढदिवस दिनांक 9 एप्रिल 2022 रोजी केंद्रीय प्राथमिक आश्रमशाळा शाहूवाडी येथे मुलांना खाऊ व कडधान्य वाटप करून सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.

वाढदिवसाचे औचित्य साधून फौंडेशन च्या पदाधिकाऱ्यांचा वाढदिवस नेहमीच सामाजिक कर्तव्याचे भान ठेवून व अवाजवी खर्चाला फाटा देऊन सामाजिक उपक्रमातून साजरे करण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून फौंडेशन चे सचिव आकाश बर्गे पाटील यांचा वाढदिवसही सामाजिक बांधिलकीतून आश्रम शाळेमध्ये लहान मुलांसोबत साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील मुलांना खाऊ व आवश्यक कडधान्याचे वाटप करण्यात आले.

समाजामध्ये असे  सामाजिक  उपक्रम नेहमीच फाउंडेशन कडून राबवले जातात असे मत फौंडेशन चे अध्यक्ष मा.श्री.सुनिल सावंत यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.




 Promoted Content : 

🔴 यश प्रताप पाटील यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून दुर्लक्षित झालेले सातवे येथील श्री. बिरदेव मंदिर प्रकाश झोतात आणत तरुणांपुढे ठेवला नवा आदर्श.

🔴 आपल्या व्यवसायाचे product/services online selling कसे करावे.

🔴 तुम्हाला मोबाईल वरून पैसे मिळवायचे आहेत ?

🔴 तुम्हाला ऑनलाईन पैसे मिळवायचे असतील तर हा लेख एकदा वाचाच..!










Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post