यश प्रताप पाटील यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून दुर्लक्षित झालेले सातवे येथील श्री. बिरदेव मंदिर प्रकाश झोतात आणत तरुणांपुढे ठेवला नवा आदर्श.


पन्हाळा (प्रतिनिधी) : यश प्रताप पाटील, रा.सातवे ता.पन्हाळा यांचा दि.११ एप्रिल ला वाढदिवस असतो  वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन ते दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करतात.  ह्या  वर्षी त्यांनी दुर्लक्षित झालेले श्री बिरदेव मंदिर प्रकाश झोतात आणत तरुणांपुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.

अनेक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले. श्री.बिरदेव मंदिर (मूळ ठिकाण) पाटील माळ, मु.पो.सातवे, ता. पन्हाळा जि.कोल्हापूर येथील अनेक वर्षांपासून दुरा-अवस्थेतील असलेल्या मंदिराच्या स्वच्छता, रंगरंगोटी, डागडुजी, दिशाफलक लावून अनेक वर्षांपासून दुर्लक्षित झालेले मंदिर प्रकाशझोतात आणत वाढदिवस साजरा केला. या आगळा - वेगवेगळ्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर साजरा केलेल्या स्तुत्य उपक्रमाचे भाविकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

आमच्याशी बोलताना यश पाटील यांनी असे सांगितले की असे उपक्रम दर वर्षी वाढदिवसाला करणार आहे आणि हे करत असताना मला गावातील मित्रांचा तसेच घरच्यांचा प्रतिसाद चांगला मिळतो. या सगळ्यांच्या साथीमुळे मी हे करू शकलो असे ते आवर्जून सांगतात.




 Promoted Content : 








Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post