पुष्पांजली जांभळे हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे 2019 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड, झाल्याबद्दल श्री वारणा शिक्षण विभाग मंडळाकडून सत्कार.


वारणानगर (प्रतिनिधी) : वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी पुष्पांजली जांभळे हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर होते.

सत्काराला उत्तर देताना पुष्पांजली जांभळे म्हणाल्या की, "मी लहानपणापासून PSI होण्याचे स्वप्न पाहिले होते. २०१७ पासून सातत्याने दोन वर्ष अभ्यास केला. अभ्यासाची तयारी, शारीरिक चाचणी आणि मुलाखत देताना प्रामाणिक प्रयत्न केले. आत्मविश्‍वासाने सामोरे गेले. माझ्या यशामध्ये यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, आई-वडिल, गुरुजन, परिवाराचा मोठा वाटा आहे. महाविद्यालयीन जीवनात इयत्ता ११ वी ते वाणिज्य शाखेतून पदवी  आणि पदव्युत्तर शिक्षण घेताना महाविद्यालयात आयोजित विविध स्पर्धा व्याख्याने याचा मोठा लाभ झाला. जून २०२२ पासून प्रशिक्षण सुरू होणार असून ग्रामीण भागातील मुलीही स्वकर्तृत्वावरती यश प्राप्त करू शकतात. त्याच्यासाठी अपार कष्ट घेण्याची तयारी आणि दोन वर्ष पूर्णपणे मोबाईल बंद ठेवून फक्त अभ्यास आणि अभ्यासच केल्याचा फायदा झाला असल्याचा त्या म्हणाल्या.

वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे (सावकर), प्रशासकीय अधिकारी डॉ.वासंती रासम यांनी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. चिकुर्डेकर म्हणाले की, पुष्पांजली जांभळे यांनी महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना, विविध खेळ, क्रीडा प्रकार, वक्तृत्व, काव्यवाचन या स्पर्धांमधून सहभाग नोंदवून आत्मविश्वास सिद्ध केला होता. अभ्यासाबरोबर विविध कलागुणांची जोपासना केली. त्यामुळेच अतुलनीय यश प्राप्त झाले आहे. महाविद्यालयीन तरुणांच्यासाठी पुष्पांजली जांभळे आदर्श आहेत असे ते म्हणाले.
प्रा.आर.बी. बसनाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. आर. एस. पांडव यांनी आभार मानले.






 Promoted Content : 



Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post