वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय मध्ये एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगर

वारणानगर (प्रतिनिधी) : वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालया मध्ये "बौद्धिक मालमत्ता अधिकार" (आय.पी.आर.) जागरूकता विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत ४०० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आणि प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकार वाणिज्य आणि औद्योगिक मंत्रालय अंतर्गत मुंबई येथील पेटंट कार्यालयातील सहाय्यक अधिकारी (श्रेणी १)  सागर पोळ उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रकाश चिकुर्डेकर होते. श्री.वारणा विभाग शिक्षण मंडळ, वारणानगर अध्यक्ष  आमदार डॉ. विनयरावजी कोरे (सावकर ) व  प्रशासन अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी  कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, नॅशनल आय.पी.आर. जागृती मिशन अंतर्गत पेटंट ऑफिस मुंबई व आय.पी.आर सेल, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.   

यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे श्री. पोळ म्हणाले की,"बौद्धिक मालमत्ता अधिकार- पेटंट (आय. पी. आर.) जागरूकता काळाची गरज आहे. पेटंट हा एक कायदेशीर अधिकार आहे. या अधिकारांतर्गत ज्या व्यक्ती कंपनीने किंवा संस्थेने निर्माण केलेल्या नवीन उत्पादन, सेवा तंत्रज्ञान याच्यावर सर्वस्व अधिकार हा त्या व्यक्तीचा असतो. इतर कोणी त्या सेवेचा किंवा उत्पादनाचा वापर हा मूळ मालकाच्या परवानगीशिवाय करू शकत नाही किंवा उत्पादनाची नक्कल ही करता येत नाही. पेटंट त्याच उत्पादनाला मिळते ज्याची कल्पना ही पूर्णपणे नवीन असायला हवी. तसेच त्यावर कोणत्याही व्यक्तीचा अधिकार नसावा. उत्पादन पेटंट आणि प्रक्रिया पेटंट अशा दोन प्रकारे पेटंट घेता येते. संबंधित मुंबई येथील कार्यालयात विना मध्यस्थ संपर्क साधून पेटंटसाठी प्रयत्न करावेत. तसेच पेटंट क्षेत्रात ही रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ चिकुर्डेकर म्हणाले की, पेटंट म्हणजे नवसंशोधनाचा आविष्कार आहे. पेटंट एक संपत्ती असून मूळ संशोधक व्यक्ती संस्थेची परवानगी न घेता वस्तूची जशीच्या तशी कॉपी करने गुन्हा ठरतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी ही नव संशोधनाकडे वळवून वेगवेगळ्या गरजांची पूर्तता करावी. मानवी जीवन सुखकर करण्यासाठी पेटेंट एक प्रभावी माध्यम आहे. ट्रेडमार्क, लोगो, कॉपीराइट या विषयावर जाणीव जागृतीची गरज असल्याचे ही ते म्हणाले. 

प्रास्ताविक समन्वयक डॉ. एस. एस. खोत यांनी केले, पाहुण्यांची ओळख डॉ. विलास पाटील यांनी करून दिली,  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस.एस. जाधव यांनी केले, व आभार  डॉ. सत्यनारायण आरडे यांनी केले.


 Promoted Content : 

🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबीर मौजे काखे ता. पन्हाळा येथे उत्साहात संपन्न झाले.

🔴  पुष्पांजली जांभळे हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे 2019 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड, झाल्याबद्दल श्री वारणा शिक्षण विभाग मंडळाकडून सत्कार.

🔴 बळीराजा सुखी होऊ दे : पालकमंत्री सतेज पाटील

🔴 तुम्हाला मोबाईल वरून पैसे मिळवायचे आहेत ?

🔴 तुम्हाला ऑनलाईन पैसे मिळवायचे असतील तर हा लेख एकदा वाचाच..

🔴 शेअर मार्केट म्हणजे नक्की आहे तरी काय. 


Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post