यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबीर मौजे काखे ता. पन्हाळा येथे उत्साहात संपन्न झाले.


वारणानगर (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबीर मौजे काखे ता. पन्हाळा येथे उत्साहात संपन्न झाले. यानिमित्ताने दोन हजार वृक्षांची गणना स्वयंसेवकांनी केली. एखाद्या गावात असणाऱ्या वृक्षांची गणना कदाचित प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने संपन्न झाली. काखे गाव आणि गावालगत असणाऱ्या वृक्षांची श्रम संस्कार शिबिराच्या माध्यमातून दोन हजार पेक्षाही जास्त वृक्षांची जीपीएस लोकेशन, अक्षांश-रेखांशासह वृक्षगणना आणि नोंदणी करण्यात आली. त्यांची स्वतंत्र रजिस्टर मध्ये नोंदणी ही झाली. शिबिरात एकूण १०० स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये मुलींची संख्या ७५ तर मुलांची संख्या २५ होती. प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि समन्वयक डॉ. सी. आर. जाधव, डॉ. आर. पी. कावणे यांच्या प्रमुख उपस्थित शिबिर संपन्न झाले.

शिबिराचे उद्घाटन सरपंच श्री. दगडू रंगराव पाटील, उपसरपंच संदीप शामराव पाटील आणि प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर, माजी उपप्राचार्य प्रा. पी.एस. पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी दीपक नामदेव पाटील.(भाऊ) यांनी सर्व स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या आणि शिबिर संपन्न करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले. शिबिर संयोजन सहाय्य अमर पाटील, आदिनाथ नलवडे, दिलीप पाटील यांनी केले. शिबिरामध्ये सात दिवसात श्रमदान, ग्रामस्वच्छता, वृक्षलागवड, मंदिर परिसर स्वच्छता, बाजार कट्टे स्वच्छता, शाळा परिसर स्वच्छता, स्मशानभुमीची स्वच्छता आणि स्मशानभूमी मध्ये वृक्ष लागवडीसाठी खड्डे काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले. श्री भैरवनाथ मंदिर परिसरात कोकम  वृक्षांची लागवड करण्यात आली. त्याच बरोबर माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत ई- प्लेज (हरित शपथ) शंभर स्वयंसेवकांनी घेतली.

दररोज दुपारच्या सत्रात चर्चासत्रे संपन्न झाली. चर्चासत्रातील सहभागी अनुक्रमे प्राध्यापक आणि त्यांचे विषय असे : 
डॉ. सर्जेराव जाधव   : ई- वाचन चळवळ, 
प्रा. रोहित बसनाईक : ई-कॉमर्स, 
डॉ. एस. एस. खोत  : जागतिक प्रश्न आणि आपण, 
सौ. वैशाली बुड्ढे       : स्त्री-पुरुष समानता,
प्रा. विकास पाटील : रशिया- युक्रेन युद्ध या विषयावर सहभाग नोंदविला. सर्व चर्चासत्रात अनेक स्वयंसेवकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. स्वयंसेवकांनी "कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी" हे घोषवाक्य घेऊन प्रबोधन फेरी ही काढली.

प्राचार्य  डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी स्वयंसेवकांनी जिल्ह्यात आणि राज्याला अभिमान वाटेल असे आगळेवेगळे कौतुकास्पद काखे गावात कामकाज केले आहे. राज्यात तसेच देशात स्वच्छतेच्या बाबतीत प्रथम  क्रमांक मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. स्वयंसेवक अमृता पाटील,  सायली पाटील, प्रसाद कोळी या स्वयंसेवकांनी आपले मनोगत या वेळी व्यक्त केले. तर काखे गावच्या ज्येष्ठ महिला सौ. संजीवनी पाटील यांनी आमदार डॉ. विनयरावजी कोरे सावकर, श्रीमती शोभाताई कोरे आईसाहेब यांच्यावर तयार केलेल्या कवितांचे ही सादरीकरण करून काखे ग्रामस्थांच्यावतीने मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांनी केलेल्या शिस्तबद्ध कार्याचा गौरव करून शुभेच्छा दिल्या. 

शिबिराचा समारोप समारंभ प्रो. डॉ. प्रकाश  चिकुर्डेकर  यांच्या अध्यक्षतेखाली आणि काखे गावचे ग्राम विकास अधिकारी श्री. शिवाजी पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. श्री शिवाजी पाटील म्हणाले की, स्वयंसेवकांचा श्रमदानामुळे "गावाला ग्राम स्वच्छतेत याआधीही यशवंत सरपंच, यशवंत ग्राम, आर. आर. आबा स्वच्छ सुंदर गाव पुरस्कार मिळाले आहेत आणि आजच्या या शिबिरामुळे स्वच्छतेचे पहिले पारितोषिक ही मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. शिबिरासाठी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे (सावकर), प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ.वासंती रासम यांनी शुभेच्छा दिल्या आणि मार्गदर्शनही केले. तर शिबिरात महाविद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भेट देऊन स्वयंसेवकांचा आत्मविश्वास वाढविला.
















































Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post