माहिती अधिकारात मागण्यात आलेल्या माहितीचा मजकूर कसा असावा.

RTI Application, Right to Information Application

📝माहिती अधिकारात मागण्यात आलेल्या माहितीचा मजकूर कसा असावा.📝"

"Right To Information"

🔰माहिती अधिकार अधिनियम, २००५ या अधिनियमात मध्ये माहिती म्हणजे काय ?

सर्वप्रथम माहिती अधिकारात कोणती माहिती आपण संबंधित प्राधिकरणाकडे मागू शकतो ते पाहूयात, दस्तऐवज, अभिप्राय, प्रकाशने, परिपत्रके आदेश, रोजवह्या, अहवाल, नमुने, प्रतिमाने, कंत्राटे ई-मेल, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण करण्यात आलेले अभिलेख, कोणत्याही खाजगी संस्थेची एखाद्या शासकीय प्राधिकरणाकडून मिळू शकणारी माहिती आपण माहिती अधिकारात माहिती मागवू शकतो.

🔰 माहिती अधिकारात मागण्यात आलेल्या माहितीचा मजकूर कसा असावा ?

माहितीचा अधिकार मध्ये माहिती मिळवण्यासाठी आपण करण्यात आलेला अर्ज स्वतः लिहून अथवा टायपिंग करून अथवा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो. त्या अर्जामध्ये अर्जाच्या मध्यभागी जोडपत्र अ नियम ३ पहा असे लिहावे. उजव्या कोपऱ्यामध्ये दहा रुपये फी स्टॅम्प चिटकवा. त्याच्याखाली माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती मिळण्याबाबत अर्जाचा नमुना असे लिहावे त्याच्या खाली डाव्या कोपऱ्यात प्रती राज्य जन माहिती अधिकारी कार्यालयाचे पत्ता असे लिहून त्याच्यासमोर ज्या अधिकाऱ्याकडे अर्ज करणार आहोत त्या प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याचे पद व कार्यालचा संपूर्ण पत्ता लिहावा. त्याच्या खाली अर्जदाराचे पूर्ण नाव घ्यावे अर्जदाराचा पत्ता आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील, माहितीचा विषय,माहिती ज्याच्या संबंधित असेल तो कालावधी हे सर्व लिहून झालेवर आवश्यक असलेल्या माहितीचे वर्णन मध्ये एका विनंती अर्ज केवळ एका विषयाशी संबंधित असणे गरजेचे आहे.त्या विषयाचे सर्वसाधारण दीडशेपेक्षा अधिक शब्द नसावेत. परंतु अर्जदाराला एकापेक्षा जास्त विषयांची माहिती हवी असेल तर त्याकरता तो स्वतंत्र अर्ज करू शकतो. अन्यथा आपला अर्ज फेटाळण्यात येऊ शकतो. त्याच्या खाली माहिती टपालाने हवी आहे की व्यक्तिशः हवी आहे ते लिहावे जर टपालाने हवी असल्यास नोंदणीकृत हवी आहे की शीघ्र टपालाने हवी आहे ते लिहावे अर्जदाराच्या उजव्या खोप्यामध्ये ठिकाण व त्याच्या खाली दिनांक  लिहावी उजव्या कोपऱ्यात अर्जदाराची सही असे लिहून त्याखाली अर्जदाराने सही करून त्याच्याखाली अर्जदाराचे नाव द्यावे असा माहिती अधिकार अधिनियम २००५ चे कलम ६  प्रमाणे आपण लेखी विनंती अर्ज करू शकतो.

आपल्या माहितीसाठी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती मिळवण्याचा अर्जाचा नमुना खाली देत आहोत.

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अन्वये माहिती मिळण्याबाबतच्या अर्जाचा नमुना


माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अन्वये माहिती मिळण्याबाबतच्या अर्जाचा नमुना"



 Promoted Content : 

🔴 माहिती अधिकार अधिनियम, २००५ अशा पद्धतीने काम करतो.

🔴 माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अन्वये माहिती मिळण्याबाबतच्या अर्जाचा नमुना ।भाग२ YouTube Video। 

🔴 माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ याच्या कलम १९(१) अन्वेय अपील।भाग३। YouTube Video। 

















Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post