पोलीस अधिकारी F.I.R नोंदवून घेत नसतील तर काय करावे?

🔰 तक्रारदाराने पोलीस ठाण्यात तक्रार कशी नोंद करायची ?

तक्रारदारास पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करायचे असेल तर त्याला पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष जाऊन तक्रार नोंद करता येते अथवा तक्रारदारास आपले म्हणणे स्वतःहून मांडण्याची इच्छा असेल तर  तक्रारदर  लिखित स्वरूपाची तक्रार सदर पोलीस ठाण्यात घेऊन जाऊ शकतो.

🔰 तक्रारदाराने तक्रार करताना काय करावे ?

तक्रारदाराने कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंद करताना घटनेचा दिवस,वेळ,स्थळ,नुकसानीचे वर्णन,उपस्थित व्यक्ती इत्यादी बाबी अचूकपणे तक्रारींमध्ये नमूद करणे अत्यंत गरजेचे आहे.

🔰 गुन्ह्याचे साधारण किती प्रकार आहेत ?

१.अदखलपात्र गुन्हा 
२.दखलपात्र गुन्हा

१.अदखलपात्र गुन्हा : N.C हा शब्द अदखलपात्र गुन्ह्यासाठी वापरला जातो या गुन्ह्यात पोलिसांना माननीय न्यायाधीशांच्या हुकुमा शिवाय अटक करण्याची परवानगी नसते या गुन्ह्यासाठी वेगळे रजिस्टर ठेवले जाते उदा. शिवीगाळ करणे,शुल्लक कारणांवरून भांडणे.

२. दखलपात्र गुन्हा : या गुन्ह्याची दखल पोलिसांना घ्यावी लागते याबाबत ताबडतोब तपास सुरू करावा लागतो या गुन्ह्यात वॉरंटशिवाय पोलिस आरोपीला अटक करू शकतात ह्या गुन्ह्याची नोंद F.I.R रजिस्टर मध्ये होते उदा. अपघात,चोरी, खून 

🔰 पोलीस अधिकारी  F.I.R नोंदवून घेत नसतील तर काय करावे?

जर संबंधित पोलिस अधिकारी F.I.R दाखल करून घेत नसतील तर कलम १५४(२) अन्वये त्यांची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षकांना लेखी स्वरूपात करता येईल त्यानंतर संबंधित पोलिस अधीक्षक स्वतः तक्रार लिहून घेऊ शकतात किंवा संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना  F.I.R दाखल करून घेण्याचा आदेश देऊ शकतात.


🔰 तक्रार नोंदवण्याचे संपर्क क्रमांक...

पोलीस नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक : १००

ज्येष्ठांना तक्रार करण्यासाठी संपर्क क्रमांक : १०९०

महिला व बालकांचे संबंधित संपर्क क्रमांक : १०३


 Promoted Content : 

🔴 तुम्हाला मोबाईल वरून पैसे मिळवायचे आहेत ?

🔴 तुम्हाला ऑनलाईन पैसे मिळवायचे असतील तर हा लेख एकदा वाचाच..!

🔴 आपल्या व्यवसायाचे कन्टेन्ट मार्केटिंग करा आणि व्यवसाय वाढवा.

🔴 शेअर मार्केट म्हणजे नक्की आहे तरी काय ?

🔴 ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी सरिता ताई ह्या एक प्रेरणादायी उदाहरण. 


























 

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post