ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी सरिता ताई ह्या एक प्रेरणादायी उदाहरण.
Aaradhya Beauty parlour |
सौंदर्य हा स्ञीचा अमूल्य दागिना आहे, तसेच, निरागस सौंदर्याला साज श्रृंगाराचीही जोड असावीच लागते. खास महिलांसाठी व मुलींसाठी नाविन्यपूर्ण व सर्व सुविधायुक्त 'आराध्या ब्युटी पार्लर' हे सौ. सरिता मिलिंद पाटील यांनी सुरू केले आहे. स्वतः च्या कर्तृत्वाच्या बळावर सरिता ताईंना अनोखा असा व्यवसाय सुरू करायचा होता म्हणून त्यांनी सौंदर्य व्यवसायात पदार्पण केले. सरिता ताईंच्या सौंदर्य व्यवसायातील कल्पना युक्तीला सत्यात उतरविण्यासाठी त्यांना मार्गदर्शन म्हणून संगीता घाटगे (मुख्याध्यापिका) कन्या विद्या मंदिर सांगलवाडी, प्रिती कस्तुरे इंदोर, शितल गौंड (सिया इंस्टीट्यूट पुणे), मिलिंद पाटील, मंगल पाटील.(आक्कासाहेब) या सर्वांनीच मोलाचे मार्गदर्शन केले आहे. तसेच, सरिता ताईंना सौंदर्य व्यवसायाकरीता विशेष सहकार्य सविता लोंढे ( सांगलवाडी), उत्कर्ष पाटील (सांगलवाडी), गायञी पाटील (सांगली), श्रुती चव्हाण (सांगली), प्राची चव्हाण (सांगली) या सर्वांचे विशेष व मोलाचे सहकार्य सरिता ताईंना लाभले.
सरिता ताईंनी M.A. , B.Ed. , A.B.T.C. इतके शिक्षण पूर्ण केले आहे. सरिता ताईंचे M.A, B.Ed. -2011-12 साली पदव्युत्तर शिक्षण हे पूर्ण केले आहे. सरिता ताईंना ब्युटी पार्लर मधील १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सरिता ताईंचा जन्म १६-जून-१९८५ रोजी वडील बाबुराव व आई लक्ष्मीबाई यांच्या पोटी झाला. सरिता ताई ह्या महिलांच्या व मुलींच्या सौंदर्याकरीता सतत अथक प्रयत्न करत असतात. ग्रामीण भागातील स्ञियांसाठी सरिता ताई ह्या एक उत्तम व प्रेरणादायी उदाहरण आहेत, कारण की आराध्या ब्युटी अकॅडमी च्या माध्यमातून अनेक महिला व मुली त्यांच्या कडून प्रशिक्षण घेऊन स्वतः चा व्यवसाय सुरू करून आज यशस्वी व्यवसासायिक म्हणून नावलौकिक करत आहेत. आपल्या ब्युटी पार्लरच्या व्यवसायासोबतच त्या त्यांच्या कुटुंबियांचा उत्तमरीत्या सांभाळ करीत आहेत. आपल्या प्रामाणिक कष्टाला, जिद्दीला योग्य व अचूक मार्गदर्शन लाभले की आपल्याला कोणतीही अशक्य गोष्ट सहज शक्य करता येते याचे उत्तम आणि रोमांचकारक उदाहरण म्हणजेच सौ. सरिता पाटील ताई आहेत. 'प्रयत्नार्थी परमेश्वर’ प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यशाचे शिखर नक्कीच गाठता येते हेच खरे. सरिता ताईंचा वार्षिक टर्न ओव्हर ७ लाख इतका आहे.
सरिता ताईंच्या आराध्या ब्युटी पार्लर' मध्ये खालीलप्रमाणे सर्व सुविधा महिलांसाठी व मुलींसाठी उपलब्ध केलेल्या आहेत :-
➢ ब्रायडल मेकअप H.D., 3D.
➢ स्किन ट्रीटमेंट
➢ स्पा
➢ ॲडव्हास हेअर कटिंग
"ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी सरिता ताई ह्या एक प्रेरणादायी उदाहरण."
|
पत्ता : -
सौ. सरिता पाटील. (A.B.T.C) आराध्या ब्युटी पार्लर,
थोरात बिल्डिंग, जुन्या जकात नाक्यासमोर, इस्लामपूर रोड, दत्त चौक,
मोबाईल .: +९१ ९९२१७२९०६१,
+९१ ८४२१२०११९१
0 Comments
आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!