Bullet Point :
• what are the taxes collected from gram panchayat | ग्रामपंचायत कोण-कोणते कर घेऊ शकते?
• How is the capital value of the building determined? |इमारतीचे भांडवली मूल्य कसे ठरवतात ?
• Excessive tax collection complaint of Gram Panchayat. |ग्रामपंचायतने जादा कर घेतल्यास तक्रार कुठे करता येते ?
• How to get online Gram Panchayat Assessment Transcript । ग्रामपंचायत असेसमेंट उतारा ऑनलाईन कसा काढतात ?
गावातील इमारती ज्या गावठाण मध्ये असोत अथवा शेत जमिन मध्ये असोत किंवा बिगर शेती प्लॉट वरती बांधण्यात आलेल्या इमारती असोत ग्रामपंचायत वार्षिक मूल्य दर विनिर्दीष्ट करत असतात. तो नमुना ८ ३२(१) प्रमाणे नोंद ग्रामपंचायत सदरी ठेवतात त्या नोंदी मध्ये ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा, वॉर्ड क्रमांक, रस्ताचे/गल्लीचे नाव, भूमपान क्रमांक, मालकाचे नाव, भोगावटदाराचे नाव, मालमत्तेचे वर्णन, मिळकत बांधकामाचे वर्ष, क्षेत्रफळ, रेडिरेडनर दर, घसारा दर, इमारतीच्या वापरानुसार भारांक, भांडवली मूल्य, कराचा दर, इमारत कर, दिवाबत्ती कर, आरोग्य कर, पाणी पट्टी, आदेशाचा शेरा या सर्व नोंदी असतात त्याला आपण बोली भाषेत ग्रामपंचायत असेसमेंट उतारा असे म्हणतात. ग्रामपंचायत इमारत कर, जमिनीवरील कर, जमिनीवरील सुधार आकार, जकात, यात्रा कर, उत्सव व करमणुक कर, व्यवसाय कर, आरोग्य कर, पाणीपट्टी, इतर कर घेवू शकते, परंतु विशिष्ट कर बसविण्याचा ग्रामपंचायतीस अधिकार नाही. ग्रामपंचायत इमारतीचे भांडवली मूल्य कसे ठरवते तुम्हास माहीत आहे का ? नसेल तर पुढील सूत्राने तुमच्या कडून ग्रामपंचायत घेत असलेला इमारतीचे भांडवली मूल्य बरोबर आहे का नक्की पाहा…
इमारतीचे भांडवली मूल्य कसे ठरवतात ? |How is the capital value of the building determined?
इमारतीचे भांडवली मूल्य=इमारतीचे क्षेत्रफळ ✖ इमारतीचे वार्षिक मूल्य दर ✖ घसारा दर ✖ इमारतीच्या वापरानुसार भारांक
ग्रामपंचायतने ने तुमच्याकडून घेतलेला कर किंवा कर वसुली बाबत तुमची तक्रार असल्यास तुम्ही कुठे तक्रार करू शकता तो तुमचा अधिकार आहे.
🔰 ग्रामपंचायतने जादा कर घेतल्यास तक्रार कुठे करता येते ? | Where can a complaint be filed if the Gram Panchayat collects excessive tax?
ग्रामपंचायत ने घेतलेला कर किंवा कर वसुली बाबत तुमची तक्रार असल्यास बिल मिळाले पासून ३० दिवसांचे आत ती तक्रार तुम्ही तुमच्या तालुक्यातील गट विकास अधिकारी पंचायत समिती यांचे कडे करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुम्हाला निकाल मिळाले तारखेपासून ३० दिवसात तुम्ही स्थायी समितीकडे अपील करू शकता.परंतु स्थायी समितीने दिलेल्या निकलाविरुद्ध अपील करता येत नाही, परंतु कलम १५५ खाली राज्य सरकारकडे तुम्ही स्थायी समितीने दिलेल्या निकलाविरुद्ध फेरतपासणी अर्ज करू शकता अथवा उच्च न्यायालयात स्थायी समितीने दिलेल्या निकलाविरुद्ध दाद मागू शकता.
👉सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील Chrome मध्ये जावून सर्चबार मध्ये aaplesarkar.mahaonline.gov.in असं सर्च करायचं आहे.
👉त्यानंतर तुमच्या समोर आपले सरकार या महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ ओपन होईल.
👉तुमचे आपले सरकार पोर्टलवर रेजिस्ट्रेशन नसल्यास ते करून घ्या.
👉पोर्टलवर लॉगिन करुन तुम्हाला योग्य वाटणारी भाषा निवडा.
👉डाव्या बाजूस असलेला 'ग्रामपंचायत व पंचायत राज विभाग' हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे.
👉तुम्हाला 'नमुना नं. ८ चा उतारा' हा पर्याय दिसेल तो पर्याय निवडून', 'Assessment Certificate' हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे.
👉तुम्हाला माहिती असणारी फॉर्म मधील संपूर्ण माहिती ८ अ उताऱ्यामध्ये भरा.
👉त्यानंतर 'Apply' बटनवर क्लिक करून 'Application Id' जतन करा आणि विहित शुल्क भरा.
तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्या पासून सात दिवसांमध्ये आपले सरकार संकेतस्थळ लॉगिन करुन तुम्ही असेसमेंट उतारा ऑनलाइन काढू शकता.
हे हि वाचा :
➦ शेत जमिनीचे सरकारी भाव कसे ठरतात… Government rate of farmland
➦ आता जमीन एन.ए (अकृषिक जमीन) ची गरज नाही ?/N-A_Non Agricultural Land
➦ ‘पोट-खराब’ क्षेत्र लागवडीक्षेत्रात कसे करावे ?
➦ जमिनीच्या फेरफार सबंधी विचारले जाणारे प्रश्न ? FAQs -Ferfar Related
➦ जमिनीची शासकिय मोजणी करणेसाठी किती पैसे भरावे लागतात ?
➦ वीज बिल येणार नाही,घराच्या छतावर बसवा सौरउर्जा पॅनल,सरकार देणार अनुदान. solar panel