कोरे अभियांत्रिकीतील शुभम पंडित यांची इंडियन आर्मी मध्ये लेफ्टनंट पदी निवड...



वारणानगर \ प्रतिनिधी : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग & टेक्नॉलॉजी (स्वायत्त संस्था) वारणानगर या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागातील माजी विद्यार्थी शुभम पंडित यांची इंडियन आर्मी मध्ये लेफ्टनंट पदी निवड झाली. सर्व्हिस सिलेक्शन बोर्डातर्फे (एस.एस.बी.) घेण्यात आलेल्या परीक्षेमधून शॉर्ट सर्विस कमिशन टेक्नीकल (एस.एस.सी. टेक. ६१- २०२३) साठी त्याची निवड करण्यात आली. मुंबई चा रहिवासी असलेल्या शुभम ने तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकीमध्ये शिक्षण घेत असताना  सुराज्य फौंडेशन तर्फे घेण्यात येत असलेल्या 'गुणवंतांचा सत्कार' कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन अभ्यासास सुरवात केली. भोसले मिलिटरी स्कूल मधून त्याने हायस्कूल पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. लेफ्टनंट पदाचे स्वप्न उराशी बाळगून शुभम ने आपली शैक्षणिक वाटचाल सुरु केली.  इंजिनियरिंग मधून लेफ्टनंट पदासाठी जास्त संधी उपलब्ध असल्यामुळे त्याने येथील श्री तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला, त्याला महाविद्यालयातील AFPI संस्थेचे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.

 तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकीत सन  २०२२-२३ मध्ये वेगवेगळ्या कंपनीत  निवड  झालेल्या  विद्यार्थ्यांचा  गौरव... 

संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर, विभाग प्रमुख  डॉ. पी. व्ही. मुळीक, मा. विश्वास कदम, चेअरमन, एएफपीआय, री. मेजर मा. चंद्रसेन कुलथे यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. देशसेवा करण्याची सुवर्ण संधी तुम्हाला मिळाली असून त्याचे सोने करा, आपल्या सेवेतून महाविद्यालयाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करा असा मौलिक सल्ला या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे यांनी शुभेच्छा संदेशात दिला. 

चंद्रसेन कुलथे यांनी लेफ्टनंट होण्यासाठी लागणारी पात्रता, निवड पद्धत आणि या पदाचे महत्व विशद केले.  कष्ट, जिद्द, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर यश निश्चित मिळते. आपल्या अभियांत्रिकीतील मेकॅनिकल चा बेस्ट आउट गोइंग स्टुडन्ट लेफ्टनंट झाला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, लेफ्टनंट होण्यासाठीची गुणवत्ता शुभम मध्ये असल्याचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर यांनी नमूद केले तसेच आर्म्ड फोर्सेस ट्रेनिंग साठी शिक्षण मंडळाचे प्रमुख, डॉ. विनयरावजी कोरे व एएफपीआय चे चेअरमन मा. कदम यांचे हि आभार मानले.  तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्याना बौद्धिक वैशिष्ट्ये व ओ.एल.क्युज. (अधिकारी होण्यासाठी लागणारे गुण) वाढवण्यासाठी कानमंत्र दिला. ससा आणि कासवाच्या गोष्टीतील कासव हे सतत चालत राहिल्यामुळे जिंकले, कामातील सातत्य आपल्याला ध्येयापर्यंत पोहचविते असे मत एएफपीआय चे चेअरमन मा. विश्वास कदम यांनी व्यक्त केले. कोरे अभियांत्रिकी महाविद्यालय भविष्यात कॅडेट तयार करणारे महाविद्यालय म्हणून ओळखले जाईल असा विश्वास हि त्यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला. 

तसेच शुभम पंडित यांनी त्याचे मत व्यक्त करताना त्यांनी कशा प्रकारे परिश्रम घेतले हे सांगितले मला महाविद्यालयातील सर्व स्टाफ चे सहकार्य व योग्य मार्गदर्शन मिळाले आणि स्वतः वर विश्वास ठेवत यशस्वी झालो असे ते म्हणाले. तसेच महाविद्यालय, पालक व शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी व इतर महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी  १५०० हुन अधिक संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. मार्क मोनीस यांनी केले, मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. पी. व्ही. मुळीक यांनी आभार मानले.


  हे हि वाचा : 

➦ यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या "वारणा २०२२-२३" या शैक्षणिक वार्षिक नियतकालिक अंकाचे प्रकाशन संपन्न...

➦ गतीशील विचारांचा कृतीशील नेता आमदार डॉ. विनय विलासराव कोरे (सावकर) | Biography | of Dr. Vinay Vilasrao Kore (Savkar)

➦ तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकीत सन  २०२२-२३ मध्ये वेगवेगळ्या कंपनीत  निवड  झालेल्या  विद्यार्थ्यांचा  गौरव... 

➦ यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालया मध्ये "जागतिक पर्यावरण दिन", विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post