राज्य जन माहिती अधिकारी कोणती माहिती फेटाळू शकतात ?

राज्य जन माहिती अधिकारी कोणती माहिती फेटाळू शकतात ?

🔰 राज्य जनमाहिती अधिकारी यांनी मागणी फेटाळली असेल तर अर्जदारास काय कळवतील?

 १. मागणी फेटाळण्याची कारणे कलमाद्वारे कळवतील.

२. मागणी फेटाळण्यात विरुद्ध अर्जदार ज्या कालावधीत प्रथम अपील अधिकार्‍याकडे अपील करू शकतो        तो  कालावधी कळवतील.

३. अर्जदारास प्रथम अपील प्राधिकरणाचा सविस्तर पत्ता कळवतील.

🔰 जन माहिती अधिकारी कोणती माहिती फेटाळू शकतात ?

१. राष्ट्राचे सुरक्षिततेबाबत ची माहिती.

२. भारताचे सार्वभौमत्व अखंडता संदर्भातील माहिती. 

३. वैज्ञानिक किंवा आर्थिक हितसंबंधांची माहिती.

४. अपराध्यास चिथावणारी माहिती.

५. विदेशी राष्ट्राशी असलेले संबंध व त्यावरील बाधा निर्माण करणारी माहिती.

६. न्यायालयाकडून मनाई करण्यात आलेली माहिती.

७. संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या विशेषाधिकारांचा भंग होणारी माहिती.

८. त्रयस्थ पक्षाची माहिती.

९. विदेशी राष्ट्राकडून गुप्त स्वरूपात मिळालेली माहिती.

१०. एखाद्या व्यक्तीची सुरक्षितता धोक्यात येईल अशी माहिती.

११. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी अडथळा निर्माण करेल अशी माहिती.

१२. गुन्हेगारांवर खटला दाखल करण्यास अडथळे निर्माण करणारी माहिती.


 Promoted Content : 

🔴 माहिती अधिकार अधिनियम, २००५ अशा पद्धतीने काम करतो.

🔴 माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अन्वये माहिती मिळण्याबाबतच्या अर्जाचा नमुना ।भाग२ YouTube Video। 

🔴 माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ याच्या कलम १९(१) अन्वेय अपील।भाग३। YouTube Video। 


Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post