Header Add

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन. Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya Warananagar (YCWM)

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya Warananagar (YCWM)

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना संदर्भ ग्रंथ आणि प्रमाणपत्र वितरण प्रसंगी प्राचार्य डॉ.प्रकाश चिकुर्डेकर, प्रा. डी. आर. धेडे, प्रा. यु. जी. जांभोरे, प्रा. आर. बी. बसनाईक.

वारणानगर/ प्रतिनिधी : 

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. " माझं मत माझं भविष्य" या विषयावर घोषवाक्य, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आज झालेल्या समारंभात प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी मतदार जनजागृती अभियान अंतर्गत मतदारांसाठी प्रतिज्ञा वाचन केले. एक हजार हून अधिक विद्यार्थी -विद्यार्थिनींनी, प्राध्यापक, कर्मचारी यांनी शपथ वाचन कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

त्यानिमित्ताने "माझं मत माझं भविष्य" हा विषय केंद्रस्थानी ठेवून वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. प्रकाश  चिकुर्डेकर यांनी वत्कृत्व स्पर्धेचे उद्घाटन केले.या वेळी बोलताना ते म्हणाले की, समृद्ध लोकशाहीसाठी युवा मतदारांनी योगदान द्यावे. स्वतः मतदार नोंदणी अभियानात सहभाग घेऊन अन्य पाच लोकांना मतदान नोंदणी आणि मतदान करण्यासाठी प्रेरित करावे असे आवाहन त्यांनी केले.

या निमित्ताने  संपन्न स्पर्धेमध्ये निवडक ३५ हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.  वकृत्व स्पर्धेतील विजेते अनुक्रमे असे :

वरिष्ठ महाविद्यालय - पृथ्वी विजय झोरे, वैष्णवी विलास गावडे, आदर्श शहाजी नांगरे.

कनिष्ठ महाविद्यालय -स्वप्नाली वसंत चौगुले, मनाली सुरेश हिरवे, अपूर्वा दिलीप पाटील.

घोषवाक्य स्पर्धा विजेते- स्वप्नाली वसंत चौगुले, साक्षी किरण पोतदार, ओंकार किरण चोपडे.  

स्पर्धा परीक्षक म्हणून सौ.ए.व्ही. मोरे व प्रा.सौ. संध्या साळोखे यांनी काम पाहिले. स्पर्धेतील सर्व विजेत्या स्पर्धकांना प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांच्या हस्ते संदर्भ ग्रंथ, प्रमाणपत्र  देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे संयोजन नोडल ऑफिसर प्रा. डॉ. डी. आर. धेडे यांनी केले.सदस्य प्रा. यु. जी.जांभोरे, प्रा. आर. बी. बसनाईक, प्रा. यु. डी. कदम यांनी संयोजन सहाय्य केले. 'नॅक' समन्वयक डॉ. एस.एस. खोत, प्रा. आण्णासो पाटील, उपप्राचार्य एस. एन. शेख, समन्वयक सर्व श्री.प्रा.वैभव बुड्ढे, प्रा.नितीन कळंत्रे, प्रा. एस. के. आतिरकर, प्रा. डी.ए. खोत, कार्यालयीन प्रबंधक बाळासाहेब लाडगावकर, अधीक्षक हरिष गायकवाड यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पन्हाळा येथील  निवडणूक सहाय्यक आशिष कांबळे, कोल्हापूर जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग) शिवाजी मानकर यांनी विशेष प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रीती शिंदे- पाटील यांनी केले. तर प्रा. यु. जी. जांभोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


 Promoted content :  

🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या वारणा द्वै - वार्षिक संयुक्त अंकाचे प्रकाशन संपन्न...   

🔴 तुम्ही कोणत्या विषयावर युट्युब चॅनेल सुरु करू शकता ? |How to Choose YouTube Niche | 

🔴 परीक्षा हे जीवनाचे अंतिम ध्येय असू शकत नाही आपण आजन्म विद्यार्थीच असतो : दत्तात्रय देवकर

🔴 कोरे फार्मसीमध्ये फार्म. डी. आणि बी. फार्मसी (प्रॅक्टिस) अभ्यासक्रमांना मान्यता / Tatyasaheb Kore College of Pharmacy

🔴  कृषि दिनानिमित्त आ.डॉ. विनय कोरे (सावकर) यांची खास मुलाखत.





Post a Comment

0 Comments