यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये हिंदी दिन उत्साहात साजरा....

Yashwantrao-Chavan-Warana-Mahavidyalaya-(YCWM)

रोपाला पाणी देऊन हिंदी काव्य वाचन स्पर्धेचा शुभारंभ करताना प्राचार्य. सोबत सहकारी प्राध्यापक.

वारणानगर / प्रतिनिधी : यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये 'हिंदी दिन' उत्साहात साजरा झाला. हिंदी सप्ताह निमित्त आयोजित काव्यवाचन स्पर्धेत ६० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवून विविध विषयावरील कविता सादर केल्या.  काव्यवाचन स्पर्धेमध्ये वरिष्ठ, कनिष्ठ व एच. एस. व्ही. सी. विभागातून हून ६० अधिक विद्यार्थी- विद्यार्थिनींनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. संघर्ष, जीवन, स्त्री, सैनिक, माता पिता,  गुरुजन, किसान, राष्ट्र, राष्ट्रप्रेम, बेटी, हिंदी भाषा, अमिरी -गरिबी, कोशिश, प्रभू, जवानी, मोहब्बत, नया दिन, मोबाईल, स्वर्ग से सुंदर धरती, फौजी, नारी शक्ती, इश्क, आज नहीं तो कल इत्यादी विषयावरील सुंदर कविता सादर केल्या. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकर्डेकर होते. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आम. डॉ. विनय कोरे (सावकर), प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. वासंती रासम यांनी हिंदी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

उपस्थित प्राध्यापक, विद्यार्थी -विद्यार्थिनी.

यावेळी अध्यक्षीय मनोगत  आणि शुभेच्छा संदेश देताना डॉ. प्रकाश चिकुर्डेकर म्हणाले की, 'हिंदी ही भारताची राजभाषा आहे. भाषेने हिमालय ते कन्याकुमारी व बंगाल ते गुजरातपर्यंतच्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एकत्र बांधण्याचे आणि त्यांच्यात  बंधुता निर्माण करण्याचे काम केले आहे. भारताच्या अखंडतेमध्ये हिंदी भाषेचे महत्त्वाचे योगदान आहे. हिंदी भाषेत करिअरच्या  विविध संधी उपलब्ध आहेत. तेंव्हा हिंदी भाषेचे महत्व ओळखून विद्यार्थ्यांनी आपली सर्वांगीण प्रगती साधावी. उच्च शिक्षणाचे माध्यम हिंदी झाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही डॉक्टर, इंजिनिअर सहज होऊ शकतील. कार्पोरेट जगताकडे आणि एकूणच जागतिक स्तरावर ती हिंदी भाषेने आपले स्थान मजबूत केले असून आज हिंदी भाषा व्यापार, व्यवसाय आणि उद्योगाची भाषा म्हणून ही ओळखली जाऊ लागली आहे. स्पर्धा परीक्षेची सर्व क्षेत्रे, चित्रपट, दूरदर्शन मालिका, वृत्तपत्र वाहिन्या अनुवाद, बँकिंग, माहिती व सूचना, तंत्रज्ञान क्षेत्रात हिंदी भाषेने आपले स्थान समृद्ध केले आहे. त्याचा लाभ विद्यार्थिनी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले." दरम्यान स्पर्धेचा शुभारंभ कुंडीतील रोपट्याला पाणी देऊन करण्यात.

गोवा पणजी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या कवी संमेलनात महाविद्यालयातील प्रा. डॉ. प्रीती शिंदे -पाटील यांची निवड होऊन सन्मान करण्यात आला त्याबद्दल आणि राष्ट्रीय छात्र सेना मुली या विभागात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रा. सौ. शिल्पा पाटील यांचा यावेळी गौरव करण्यात आला. काव्यवाचन स्पर्धेतील सर्व विजेत्यांना प्राचार्य प्रकाश चिकुर्डेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू,गुलाब  पुष्प देवून गौरविण्यात आले. 🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय मध्ये विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील गुरुजनांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला.

स्पर्धेतील विजेते अनुक्रमे असे - वरिष्ठ विभाग : कु. पृथ्वी विजय झोरे , कु. साक्षी सूर्यवंशी, कु. धनश्री कुमार परीट व कु. अनघा सरूडकर (उत्तेजनार्थ) कनिष्ठ विभाग : कु. आरती बोराटे, कु. क्रांती अनिल पाटील, कु. राणी निवृत्ती सपकाळ, कु निलाक्षी माने व कु. दीक्षा चंद्रकांत पायमल यांना संयुक्तपणे(उत्तेजनार्थ). तर एच.एस.व्ही.सी. विभाग- कु. मनाली सुरेश हिरवे, कु. वैष्णवी तानाजी मदने, कु. सानिका बाबासो सकटे व कु. समृद्धी संदीप पाटील, तर कु. अपूर्वा दिलीप पाटील, कु. स्वप्नाली वसंत चौगुले यांचा संयुक्तपणे उत्तेजनार्थ.  स्पर्धेचे संयोजन  प्रकाश चिकुर्डेकर यांनी केले. तर प्रा. मोहन सनगर, प्रा. वंदना पाटील, प्रा. ए. ए. कुरणे यांनी संयोजन सहाय्य केले.  या वेळी डॉ. बी.के. वानोळे व डॉ. आर.एस.पांडव यांनी स्पर्धा परीक्षक म्हणून कामकाज पाहिले. कनिष्ठ विभागाचे समन्वयक प्रा. दिलीप खोत, नॅक चे समन्वयक डॉ. एस.एस. खोत, डॉ. पी.एस. राऊत, डॉ. प्रिती शिंदे, प्रा. वर्षा रजपूत, प्रा. शिल्पा पाटील, प्रा. यु. जी. जांभोरे, प्रा. अमित शेटे, प्रा. के.जे.मदने, प्रा. दिपाली मोरे-पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्याप्रमाणावर उपस्थित होते.  कार्यक्रमप्रसंगी प्रा. मोहन सनगर यांनी सूत्रसंचालन तर प्रा. वंदना पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.



 Promoted Content : 

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post