स्वराज्य मित्र मंडळ नवे पारगांव यांच्या मार्फत भव्य रक्तदान शिबीर संपन्न....

 



हातकलंगले / प्रतिनिधी :

हातकलंगले तालुक्यातील नवे पारगांव गावामध्ये स्वराज्य मित्र मंडळ नवे पारगांव यांनी एक वेगळा नवीन उपक्रम राबवला तो म्हणजे स्वराज्य मित्र मंडळ नवे पारगाव व महात्मा गांधी हॉस्पिटल ब्लड सेंटर नवे पारगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. रक्तदान संकलनासाठी आलेल्या डॉ. नईम मुल्ला, डॉ.प्रमोद मंगसुळे, वैभव पाटील, सरिता इंगळे, महेश पाटील यांचे  मंडळाचे अध्यक्ष सचिन इंगळे यांचा वतीने स्वागत करण्यात आले. लोकनियुक्त सरपंच प्रकाश देशमुख यांनी गणेश उत्सवात धार्मिक कामाबरोबरच समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मंडळाचे अभिनंदन केले. यावेळी मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपाध्यक्ष रोहित पाटील सचिव विशाल पाटील खजिनदार भरत माने, भारत पाटील अध्यक्ष SF ग्रुप तसेच अनेक युवक उपस्थित होते. यावेळी ८७ लोकांनी रक्तदान करून सहकार्य केले त्याबद्दल स्वराज्य मित्र मंडळ कडून चहा व नाश्त्याची उत्तम सोय करण्यात आली होती.




 Promoted Content : 

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post