यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय मध्ये विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील गुरुजनांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला.

 

वारणानगर / प्रतिनिधी   : 

वारणानगर, येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय मध्ये विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील गुरुजनांचा सन्मानपत्र गुलाब पुष्प आणि भेटवस्तू देऊन गौरव केला. कनिष्ठ महाविद्यालय इयत्ता १२ वी विज्ञान मध्ये शिकत असलेल्या विशेषता ४०० हून अधिक विद्यार्थिनींनी आयोजित केलेल्या या गौरवपूर्ण समारंभास श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आ. डॉ. विनय कोरे- सावकर, प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी गुरुजनांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ प्रकाश चिकुर्डेकर होते. उप- प्राचार्य एस. एन. शेख, समन्वयक प्रा वैभव बुड्ढे, प्रा. नितीन कळंत्रे उपस्थित होते. अभिश्री, चैत्राली, साक्षी, संध्या पाटील आणि विद्यार्थिनींनी संयोजन केले. प्रा. सौ. शिल्पा पाटील, प्रा. संध्या साळोखे व सहकार्यानीं यांनी संयोजन सहाय्य केले.

विद्यार्थिनी कु.भक्ती पवार, रिया पाटील, श्रद्धा माळी यांनी मनोगतात गुरुजनांच्या बद्दल आदर व्यक्त करून त्यांच्या कार्याचा गौरव पूर्ण उल्लेख केला. अध्यक्षीय मनोगतात डॉ. प्रकाश चिकुर्डेकर म्हणाले की, जीवनात शिक्षकांचे  अनन्यसाधारण महत्व असून राष्ट्र आणि समाज जडणघडणीच्या  कार्यात शिक्षकांचे योगदान मोठे असून शिक्षकच भ्रष्टाचारापासून दूर आहेत. शिक्षकांनी भ्रष्टाचार मुक्त समाज घडविण्याचे संस्कार विद्यार्थ्यांच्यावर करावेत. शिक्षण क्षेत्रात कौशल्यावर आधारित शिक्षणाची गरज असून पारंपारिक शिक्षणाला कौशल्याची जोड देणे काळाची गरज झाले आहे. गुणवत्तेच्या स्पर्धेत मधल्या आणि शेवटच्या फळीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता आणि चिंतन सर्वच क्षेत्रात होणे आवश्यक" असल्याचे ही त्यांनी सांगितले. 

स्वागत प्रास्ताविक कु. क्रांती पाटील हिने केले. सूत्रसंचालन कु. मयुरी रणसिंग, क्रांती पाटील यांनी  तर आभार कु. प्रेरणा शिंदे हिने मानले.


 Promoted Content : 

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post