श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालयात स्वराज महोत्सव या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

 श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ, वारणानगर संचलित श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालय, येलूर

शाहुवाडी / प्रतिनिधी : 
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात स्वराज महोत्सव या उपक्रमाअंतर्गत  शुक्रवार दि. 12 ऑगस्ट 2022 रोजी महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशभक्तीपर गीते, पोवाडा, लोकगीतांचा कार्यक्रम विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. या कार्यक्रमास शाहूवाडी तहसीलचे निवासी नायब तहसिलदार मा. श्री. रविंद्र मोरे यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. शाखा समन्वयक प्रा. डी. एस. पोवार हे अध्यक्षस्थानी होते, प्रा. एम. जी. पाटील यांनी प्रास्ताविक केले, देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. ए. बी. पोवार यांनी तर प्रभारी प्राचार्य प्रा. आर. एस. पाटील यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. डी. मोहिते यांनी केले. याप्रसंगी प्राध्यापक-प्राध्यापिका, कार्यालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


 Promoted Content : 

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post