आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी होऊया - सुराज्य फौंडेशनचे अध्यक्ष मा. श्री. एन. एच. पाटील (सर)...
वारणानगर / प्रतिनिधी :
भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीस ७५ वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा' या अभियानाची घोषणा केली होती. राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था, इतर कार्यालय यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या अभियाना अंतर्गत आज शाहूवाडी पन्हाळ्याचे आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या वारणानगर येथील जनसंपर्क कार्यालय येथे सुराज्य फौंडेशनचे अध्यक्ष मा. श्री.एन.एच.पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला...
तिरंगा म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रतिक आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत राष्ट्रध्वजाचा मान व सन्मान राखून घरो घरी तिरंगा या देशव्यापी अभियानात सहभागी होऊया आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी होऊया असे आवाहन सुराज्य फौंडेशनचे अध्यक्ष मा. श्री. एन. एच. पाटील यांनी केले...
यावेळी जनसंपर्क कार्यालय, सुराज्य फौंडेशन व नवशक्ती निर्माण संस्था येथील सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते...
Tags:
News