रिलायन्स फौंडेशन चा शेती करतांना योग्य व्यवस्थापन व आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा - श्री. दत्तात्रय आरंडे, कोल्हापूर.

Advantages of Proper Management and Modern Technology in Farming Advantages of Proper Management and Modern Technology in Farming Advantages of Proper Management and Modern Technology in Farming
 

नाव :  श्री. दत्तात्रय आरंडे  (मोबाईल नं -  +९१ ९४०३५४९३११)
रा. आनुर ता.कागल , जि. कोल्हापूर.
एकूण शेती :- १ एकर उस शेती,  स्वतःची १० गुंठे जमीन, तसेच (२.५ एकर भाडेतत्वाने)

शेती करतांना योग्य व्यवस्थापन आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा.     

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्हा हा जास्त पावसाचा  भाग म्हणून ओळखला जातो. या भागामध्ये नेहमीच पावसाचे प्रमाण इतर जिल्हापेक्षा जास्त असते. त्यामुळे जिल्ह्यामध्ये पाण्याची उपलब्धता जास्त असल्याने विहिरी, उपसा सिंचन , कालवे याचे प्रमाण जास्त असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामध्ये रब्बी व खरीप हंगामामध्ये ही पिके  येथील शेतकरी घेत आसतात.  त्यामध्ये  उस , भात, भाजीपाला, मका, सोयाबीन इत्यादि मुख्य पिके आहेत. शेतकऱ्यांना  शेती करत असताना योग्यवेळी योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना  अपेक्षित उत्पादन मिळत नाही. अचूक माहिती अभावी शेतकऱ्यांचे नुकसान होते आणि शेतकऱ्यांना कष्ट व उत्पादन खर्चाच्या तुलनेत नफा होत नाही. पण रा. आनुर, ता. कागल, जि. कोल्हापूर येथील उस उत्पादक शेतकरी श्री. दत्तात्रय आरंडे या शेतकऱ्यांने रिलायन्स फौंडेशन यांच्या मार्फत हंगामानुसार उस पिकासंदर्भात खत व्यवस्थापन व कीड व्यवस्थापन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यामध्ये ऑडीओ कॉन्फरन्स, डायल ऑउट कॉन्फरन्स, १८०० ४१९ ८८०० या हेल्पलाइन  सेवांच्या माध्यमातून मिळणाऱ्या  मार्गदर्शनामुळे २०२२ साली उस पिकाचे भरगोस उत्पन्न मिळवले आहे. 🔴   जय उस रोपवाटिका माले ता. पन्हाळा जि. कोल्हापूर

श्री. दत्तात्रय आरंडे हे आपल्या कुटुंबासोबत (२ मुले आणि पत्नी) रा. आनुर  ता. कागल , जि. कोल्हापूर येथे राहतात.  या ठिकाणी त्यांची वडीलोपार्जित १ एकर ओलीताची शेती आहे. ओलीतासाठी शेतामध्ये उपसा सिंचन व विहीर आहेत. या शेतीत उस, मका भाजीपाला ही प्रमुख पिके घेतात. श्री. दत्तात्रय आरंडे सांगतात की ते अगोदर शेती  पारंपरिक पद्धतीने म्हणजे वडील पूर्वी ज्या पद्धतीने शेती करत होते त्या पद्धतीने शेती करत होते. त्यामुळे त्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान माहिती नव्हती. जरी त्यांना माहिती कृषि विभागातून मिळायची परंतु मशागत, पिकाच्या दोन ओळींमधील अंतर,  खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन,  कीड व रोग यांचे नियंत्रण,  माती परीक्षण अशा बऱ्याच गोष्टीची त्याना माहिती मिळतच  नव्हती.  कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील आनुरसारख्या भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्यानी पूर परिस्थिती निर्माण होते यामुळे   शेतीमध्ये अपेक्षित उत्पन्न मिळवणे तसे कठीणच काम आहे. त्यामुळे श्री. दत्तात्रय आरंडे यांचा सुद्धा खर्चाचा व उत्पादनाचा ताळमेळ बसत नव्हता. आणि एवढी शेती असून सुद्धा अपेक्षित उत्पन्न होत नव्हते.  शेती करत असताना पिकावरती कोणता कीड किंवा रोग पडला तर जे औषध कृषिसेवा केंद्र दुकानदार देत होते त्याची फवारणी करत होते. ती औषधे खूप महागडी होती. व कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे यावरून औषधाची फवारणी करत होते. अतिरिक्त रासायनिक खत वापरत असल्याने जमिनीचा कस कमी होत होता व त्यामुळे उत्पादन वर्ष दर वर्षी कमी होत होते परंतु उत्पादन खर्चात वाढ होत होती आणि उत्पादनही  त्या पटीत मिळत नव्हते. शेतीविषयक योग्य सल्ला मिळत नव्हता.

Advantages of Proper Management and Modern Technology in Farming Advantages of Proper Management and Modern Technology in Farming Advantages of Proper Management and Modern Technology in Farming

रिलायन्स फौंडेशनचे मार्गदर्शन मिळण्याअगोदर नवीन तंत्रज्ञानाची तसेच बाजारातील तयार खते वापरण्या पेक्षा जमिनीची आवश्यकता ओळखून खत कशापद्धतीने टाकावी याची माहिती शेतात काम करताना मिळत नव्हती. त्यामुळे त्याना शेतीतून अपेक्षित उत्पादन मिळत नव्हते. उत्पादन खर्चाच्या तुलनेत नफा होत नव्हता. त्यामुळे शेती ही फायद्याची नाहीच असेच काही श्री. दत्तात्रय आरंडे यांना वाटत होते. श्री दत्तात्रय आरंडे हे २०१९ पासून रिलायन्स फौंडेशन यांच्या संपर्कामध्ये या मित्राने दिलेल्या रिलायन्स फौंडेशनच्या शेती विषयक मोफत कार्याविषयी माहितीने रिलायन्स फौंडेशनच्या ऑडीओ कॉन्फरन्स, डायल ऑउट कॉन्फरन्स, १८००-४१९-८८०० क्रमांक रिलायन्स फौंडेशनच्या टोल फ्री क्रमांकाची माहिती मिळाली. २०१९ पासून ऑडीओ कॉन्फरन्स, डायल ऑउट कॉन्फरन्स मध्ये सहभागापासून  ते टोल फ्री क्रमांकावर फोन करून   पीक व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन याविषयी माहिती मिळवत आहे. श्री.दत्तात्रय आरंडे ह्यांनी २०२१ नोवेंबर-डिसेंबर मध्ये ऊसाची लागवड केली तसेच पिकासाठी अवश्यक असणाऱ्या रासायनिक खत हे नत्र, स्फुरद, पालश, या घटकामध्ये कशा पद्धतीने दिले पाहिजे याची माहिती मिळवली खते जमिनीवर खत पेरणी अवजाराच्या साह्याने द्यावी युरिया खत देताना निंबोळी पेंडीबरोबर ६ – १ या प्रमाणात मिसळून द्यावीत  ऊस लागणीअगोदर बेणेप्रक्रिया - एक लिटर ऍसिटोबॅक्‍टर डायझोट्रॉफिक्‍स हे जिवाणू खत प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये बेणे १० मिनिटे बुडवून ठेवावे किंवा लागणीनंतर ६० दिवसांनी उसाच्या पानांवर फवारणी केल्यास शिफारशीत नत्र खतमात्रेत ५० टक्के बचत होते. एकरी २४ किलो गंधकाचा वापर केला असता स्फुरद आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचीही उपलब्धता वाढते याविषयी  माहिती मिळाली. तसेच हवामानाचा अंदाज टोल फ्री क्रमांकावरून माहिती वेळोवेळी मिळवली. रिलायन्स फौन्डेशनच्या टोल फ्री १८०० ४१९ ८८०० या नंबरचा योग्यवेळी फोन करून माहिती त्यांना वेळोवेळी मिळाली. तसेच इतर शेतकर्यांयनाही या टोल फ्री क्रमांकावरून मिळणारी माहिती सांगत होते. तज्ञांकडून मिळणार्या. या शेतीविषयक माहितीचा वापर  शेतात त्यांनी  वेळो वेळी करून घेतला आहे. या माहितीच्या आधारेच श्री. दत्तात्रय आरंडे यांनी शेतात युरिया, स्फुरद आणि  म्युरेट ऑफ पोटॅश, तसेच ८६०३२ या बियाणाचा वापर केला व करपा व तांबेरा या रोगासाठी बाव्सिस्टीन  मेंकोझेब आणि हुमणी या नियंत्रणासाठी मेटाराइझम जैविक बुरशी औषधांचा वापर केला. योग्यवेळी १९:१९:१९ व सूक्ष्म अन्नद्रव्य यांची योग्य फवारण्या तसेच खताचे योग्य डोस याविषयी चांगली माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च जवळ जवळ २०% टक्क्यांनी कमी झाला आहे असे श्री. दत्तात्रय आरंडे सांगतात.

श्री. दत्तात्रय आरंडे यांनी २०२१ साली नोवेंबर-डिसेंबर मध्ये १ एकर मध्ये उस  लागवड केली होती. त्यांनी उस पिकासाठी टोल फ्री क्रमांकावरून आणि ऑडीओ कॉन्फरन्स, डायल ऑउट कॉन्फरन्स  कार्यक्रमामधून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे सपूर्ण नियोजन केले होते.  श्री. दत्तात्रय आरंडे यांना उस  पिकच्या उत्पादनाचा खर्च १ एकर मध्ये ६०,००० रुपये आला. मागील वर्षी ७०,००० रुपये आला होता याच्या तुलनेत हा खर्च खूपच कमी आहे असे ते सांगतात. पूर्वीचे उस पिकाचे उत्पन्न फार कमी होत होते. श्री. दत्तात्रय आरंडे यांना २०२२ जानेवरी मध्ये उसाचे उत्पन्न जवळ जवळ १५ टनाने वाढले आहे. त्यांना उस 3000 रुपये टन असा भाव मिळाला. त्यांना उस पिकातून एकूण १,५०,००० लाख. एवढे उत्पन्न मिळाले. यासाठी त्यांना ६०,०००  (यामध्ये मशागत, रासायनिक खत तननियंत्रण , पाणी व्यवस्थापन )रुपये एकूण खर्च आला आहे. आणि खर्च वजा जाता त्यांना १ एकर क्षेत्रामधून ९०,००० हजार रूपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे, हा नफा भाडे तत्वाने करारानुसार पैसे वजा करून भेटला आहे.  रिलायन्स फाउंडेशन कडून मिळणार्यार महितीमुळे त्यांचा उत्पादनात जवळ जवळ १५ टनाने वाढ झाली आहे असे दत्तात्रय आरंडे सांगतात. याचबरोबर त्यांच्याकडे भात व सोयाबीन ही पिके सुद्धा होती. 

रिलायन्स फौडेशनकडून दिल्या जाणार्याल सेवा ह्या शेतकऱ्यांना अगदी मोफत आहेत. यासाठी सुद्धा त्यांना चांगले मार्गदर्शन मिळाले व त्यामधून सुद्धा त्यांना चांगले उत्पन्न मिळाले असे ते सांगतात.तसेच कमी खर्चात उत्पादन चांगले व्हावे व त्यांचे जीवनमान सुधारावे अश्याच हेतूने रिलायन्स फाउंडेशन शेतकर्यांनसाठी काम करत आहे. शेती करत असताना त्याविषयीची माहिती कुणाला विचारावी हाच प्रश्न शेतकऱ्यांना असतो त्यामुळे रिलायन्स फौंडेशनच्या १८०० ४१९ ८८०० या टोल फ्री क्रमांकाचा वापर करून  शेतरी माहिती मिळवू शकतो असे दत्तात्रय आरंडे सांगतात. यासाठी रिलायन्स फाउंडेशनला ते धन्यवाद देतात

 Promoted Content : 

🔴 माहिती अधिकार अधिनियम, २००५ अशा पद्धतीने काम करतो.

🔴 असा दाखल करा मोबाईल वरून माहिती अधिकार अर्ज आणि आपणास हवी असणारी माहिती मिळवा.

🔴 अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिया कशी असते. Engineering Diploma Admission Process ?

🔴 आय.टी.आय क्षेत्रात करिअर केल्यावर मिळेल चांगल्या पगाराची नोकरी...

🔴   तुमचे मतदार यादीत नाव नाही? असे नोंदवा मतदार यादीमध्ये नाव...       

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post