पन्हाळा तालुक्यातील पोहाळे येथील सरदार पाटील शेतकऱ्याला ऊस पिकातून मिळाले 96 हजार रुपये.रिलायन्स फाऊंडेशनच्या शेती विषयक मार्गदर्शन सेवेचा झाला फायदा.

पन्हाळा तालुक्यातील पोहाळे येथील सरदार पाटील शेतकऱ्याला ऊस पिकातून मिळाले 96 हजार रुपये.रिलायन्स फाऊंडेशनच्या शेती विषयक मार्गदर्शन सेवेचा झाला फायदा.

Reliance Foundation
सरदार पाटील 

पन्हाळा (प्रतिनिधी):  कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने ऊस, भात, भुईमूग, मका आदी वार्षिक पिके घेतात. पाणी मुबलक असल्यामुळे बहुतांशी शेतकरी ऊस हेच प्रमुख पीक घेतात. शेतकऱ्यांना ऊसाचे किफायतशीर उत्पादन कसे घ्यावे याचे योग्यवेळी अचूक असे शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना अपेक्षित असा फायदा होत नाही. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील पोहाळे (ता.पन्हाळा ) येथील शेतकरी सरदार गणपती पाटील या शेतकऱ्यांने रिलायन्स फौंडेशनच्या ध्वनि संदेश सेवा,ऑडिओ कॉन्फरन्स, व्हाट्सअप ग्रुप माध्यमातून तसेच १८००-४१९-८८०० या टोल फ्री क्रमांकाचा वापर करून  मिळालेल्या माहितीच्या आधारे आपल्या शेतात उसाचे किफायतशीर उत्पादन घेतले आहे.रिलायन्स फाऊंडेशनच्या शेती विषयक वरील सेवेमुळे सरदार पाटील यांना 96 हजार रुपये मिळाले आहेत.

         पोहाळे,ता.पन्हाळा (जि.कोल्हपुर)या गावातील शेतकरी सरदार गणपती पाटील यांचे पत्नी, मुलगा व मुलगी असे कुटुंब आहे.या गावात त्यांची 22 गुंठे शेती आहे.सरदार यांचे शिक्षण इयत्ता दहावी झाले आहे. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने ते ऊस, भात, भुईमूग आदी वार्षिक पिके घेतात.तर ऊस हे प्रमुख पीक घेतात. सरदार पाटील ऊस शेती  पारंपरिक पद्धतीने करत होते.जमिनीची मशागत करताना कंपोस्ट खतांचा वापर करत नव्हते.ऊस लागवड करण्यासाठी सरी अडीच ते तीन फुटाची सोडत होते.लागणीसाठी खोडवा ऊसाचे बियाणे वापरत होते.उसात अंतर पीक म्हणून मका पीक घेत होते.त्यामुळे ऊसाचे उत्पादन कमी मिळत होते.भरमसाठ पाट पध्दतीने पाणी देत होते. रासायनिक खतांच्या मात्रा कशा प्रकारे द्यायला हव्या याची माहिती नव्हती. बाजारात उपलब्ध असणारे कमी दरातील रासायनिक खतांचा वापर करत होते.किडीचा व रोगाचा प्रादुर्भाव जास्त होत होता तो रोखण्याचे प्रतिबंधात्मक उपाय सुद्धा सरदार पाटील यांना माहिती नव्हता ऊस पिकाला पाण्याचे नियोजन करण्याची योग्य पध्दत माहिती नव्हती तसेच तन नियंत्रण करण्यासाठी खर्च येत होता. खडकाळ जमिनीमध्ये हुमणीचा प्रादुर्भाव अशा समस्या  ऊस शेती करत असताना सरदार पाटील यांना येत होत्या.शेती करताना योग्य वेळी अचूक माहिती न मिळणे त्यामुळे उत्पादन खर्च वाढायचा व अपेक्षित उत्पादन मिळत नव्हते.अनियमित खत व्यवस्थापनामुळे 22 गुंठ्यांत उत्पादन खर्च हा जवळ जवळ  8000 रुपये ते 9000 रुपया पर्यंत खर्च येत होता.माती परीक्षण कधीच केलेले नव्हते व त्याविषयी माहिती व महत्व जास्त माहिती नव्हते.एकंदरीत त्याना ऊस पिकांचे किफायतशीर उत्पादन कसे घ्यावे याचे आधुनिक तंत्रज्ञान माहिती नव्हते. त्यामुळे त्याना 22 गुंठ्यांत उसाचे उत्पादन कमी मिळत होते.ऊस शेतीतून कमी नफा मिळत होता.यामुळे ते ऊस शेती करताना निराश होत होते.

 🔴 फायदेशीर मुक्त संचार गोठा पद्धत.

          सरदार पाटील रिलायन्स फाउंडेशनच्या संपर्कामध्ये 2017 पासून ध्वनि संदेश सेवेद्वारे संपर्कात आले. त्यानंतर ऑडिओ कॉन्फरन्स आणि शेतकर्‍यांच्या व्हाट्सअप ऑनलाइन  कार्यक्रमांच्या माध्यमातून आज पर्यंत रिलायन्स फाऊंडेशनच्या संपर्कामध्ये आहेत. तसेच फाऊंडेशनच्या टोल फ्री क्रमांक 1800- 419-8800 या नंबर वरून आवश्यक वेळेनुसार हवामान,कीड, रोग नियंत्रण, जमीनीची मशागत, खत ,पाणी व्यवस्थापन माहिती मिळवत आहेत.  सरदार पाटील हे रिलायन्स फाऊंडेशनच्या संपर्कामध्ये आल्यानंतर ऊस शेती करत असताना माती परीक्षणाचे महत्व तसेच सेंद्रिय कर्ब किती असावे.जमिनीचा सामू किती असावा.जमिनीमध्ये कोणते अन्नद्रव्ये असतात. ऊस पिकाला कोणते अन्नद्रव्य आवश्यक असतात. याची माहिती मिळाली.खत व्यवस्थापन करताना नत्र,स्फुरद पालाश हे माती परीक्षणाच्या नमुने नुसार पिकाला दिले गेले पाहिजे हे हे समजले. शेतीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी शेणखत आणि गांडूळ खताचा वापर करावा.त्याचबरोबर निरोगी आणि शुद्ध बियाण्याची निवड व बीज प्रक्रिया कशी करावी याची माहिती मिळाली.विविध रोग व किडीचे नियंत्रण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय कसे करावेत याची माहिती फाऊंडेशनच्या कार्यक्रमांमधून व टोल फ्री नंबर वरून पाटील यांना मिळाली.

🔴 रिलायन्स फाऊंडेशनचा सल्ला तरुण शेतकर्‍यांना ठरत आहे, हक्काचे व मार्गदर्शनाचे ठिकाण… ऊस शेतीमधून मिळविले 45000 रुपये.

           सरदार पाटील यांनी रिलायन्स फाऊंडेशनकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शेतीची मशागत करताना बारा गुंठ्यांसाठी दोन गाड्या शेणखत टाकले. चार ते साडेचार फुटाची सरी सोडली. 92005 या बियाण्याची माहिती मिळाली. बियाणे वरती मेंकोझेबव क्लोरोपायरीफॉस या बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची बीजप्रक्रिया करण्याची माहिती मिळाली. तसेच नत्र स्फुरद पालाश या खतांचा डोस चार हप्त्यांमध्ये देण्याची माहिती मिळाली त्याच बरोबर लोह मॅंगेनीज फॉस्फरस या सूक्ष्म अन्नद्रव्यांची माहिती मिळाली.तांबेरा व करपा रोगाचे नियंत्रण करण्यासाठी बाविस्टीन किंवा मॅन्कोझेब तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात वापरुन फवारणीची माहिती मिळाली.या सर्व  माहितीचा वापर केल्यामुळे शेतामध्ये रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला.फाउंडेशन मधून मिळणाऱ्या सर्व माहितीचा वापर शेतीमध्ये केल्यामुळे सरदार पाटील यांचे ऊसाच्या उत्पादनात वाढ झाली.

        युरिया, 10:26:26 , खताचा वापर केला.पिकाच्या आवश्यकतेनुसार सरी पद्धतीने पाणी दिले.19:19:19 , झिंक सल्फेट, बोरॉन याची फवारणी घेतली. तसेच करपा किंवा तांबेरा रोगासाठी बावीस्टीन आणि क्लोरोपायरीफोस या कीटक नाशकाची आवश्यकतेनुसार फवारणी केली.रिलायन्स फाऊंडेशनच्या संपर्कात येण्यापूर्वी  पाटील यांना उत्पादन खर्च  9000 रुपये येत होता. त्याना रिलायन्स फौंडेशनकडून माहिती व मार्गदर्शन मिळाल्यानंतर होणारा उत्पादनाचा खर्च  6500 रुपये आला.उत्पादन खर्चात बचत झाली.मागील वर्षाचे उत्पादन 18 टन झाले होते .यापासून  54,000 रुपये मिळाले होते.यावर्षाचे ऊस उत्पादन  32 टन  झाले. बाजार भावदर 1 टन = 3000 रुपये प्रमाणे  96,000 रुपये मिळाले.सरदार पाटील यांनी रिलायन्स फौंडेशनच्या सर्व सेवेचे  आभारी मानले आहेत. इतर शेतकऱ्यांना या सेवेचा लाभ घेऊन  शेतीचे उत्पादन वाढवावे. तसेच रिलायन्स फाउंडेशन सेवेची माहिती सांगत आहेत.




Promoted Content : 






Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post