राज्य जन माहिती अधिकारी त्रयस्थ पक्षाची माहिती देऊ शकतो का ?

Right to Application RTI

✍️ राज्य जन माहिती अधिकारी त्रयस्थ पक्षाची माहिती देऊ शकतो का ?

🔰 त्रयस्थ पक्षीय माहिती म्हणजे काय ?

माहिती अधिकारा मध्ये माहिती मिळवणारी अर्जदार व्यक्ती खेरीज अन्य व्यक्ती त्यात शासकीय प्राधिकरणाचा समावेश होत असतो अशा माहितीस त्रयस्थ पक्षीय माहिती असे म्हणतात.

🔰 त्रयस्थ पक्षीय कोणती माहिती उघड करता येत नाही ? 

१. त्रयस्थ पक्षाकडून गोपनीय समजण्यात येणारी माहिती.

२. त्रयस्थ पक्षाच्या स्पर्धात्मक स्थानाला हनी पोहोचणारी माहिती.

३. त्रयस्थ पक्षाच्या व्यापार किंवा वाणिज्य  गुपितांची माहिती.

४. त्रयस्थ पक्षाचा हितसंबंधास निर्माण करणारी माहिती.

🔰 माहिती अधिकारांमध्ये अर्जदाराला त्रयस्थ पक्षाची माहिती मिळू शकते का ?

अर्जदाराने त्रयस्थ पक्षाची माहिती माहिती अधिकारात मागवली असल्यास राज्य जन माहिती अधिकारी संबंधित माहिती अधिकार मागणी अर्ज नमुना ड मध्ये नोंद करेल. त्यानंतर मागणी प्राप्त झाल्यापासून पाच दिवसांच्या आत त्रयस्थ पक्षाला नोटीस बजावेल संबंधित पक्षाला नोटीस मिळालेल्या तारखेपासून दहा दिवसाच्या आत लेखी किंवा तोंडी निवेदन देणे गरजेचे आहे. माहिती अधिकार त्रयस्थ पक्षाचे देण्यात आलेल्या निवेदन लक्षात घेऊन माहिती उघड करावी की कसे यावर निर्णय घेईल परंतु संबंधित  त्रयस्थ पक्षाची माहिती जनहितासाठी असेल तर राज्य जन माहिती अधिकाऱ्यास उघड करावी लागेल. जर जनमाहिती अधिकारी यांनी माहिती अधिकारात माहिती देण्यात टाळाटाळ केली अथवा देण्यात आलेल्या निर्णय आपल्यास मान्य नसल्यास तर आपण माहिती अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम १९ (१) प्रथम अपील करू शकतो. त्यानंतर प्रथम अपिलीय अधिकारी संबंधित प्रकरणाबाबत सुनावणीसाठी तारीख किमान सात दिवस आधी अपीलकारास कळवेल. सदर सुनावणीस अपीलकारास व्यक्तीश:  किंवा प्राधिकृत करण्यात आलेल्या प्रतिनिधी मार्फत अथवा लेखी म्हणणे देऊन आपले म्हणणे मांडू शकतो. राज्य जन माहिती अधिकारी आणि अपिलीय काराचे म्हणणे विचारात घेऊन प्रथम अपिलीय अधिकारी माहिती उघड करावी का करू नये असा आदेश संबंधित राज्य जन माहिती अधिकारी कळवेल त्याची प्रत अपीलकारास देईल. अपिलीयकारास सदर निर्णय मान्य नसल्यास माहिती अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम १९ (३) अन्वये द्वितीय अपील करू शकतो.  


 Promoted Content : 

🔴 माहिती अधिकार अधिनियम, २००५ अशा पद्धतीने काम करतो.

🔴 माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अन्वये माहिती मिळण्याबाबतच्या अर्जाचा नमुना ।भाग२ YouTube Video। 

🔴 माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ याच्या कलम १९(१) अन्वेय अपील।भाग३। YouTube Video। 


Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post