राज्य जनमाहिती अधिकाऱ्यावर कोणती माहिती देणे बंधनकारक नाही ?

 

 "📝राज्य जनमाहिती अधिकाऱ्यावर कोणती माहिती देणे बंधनकारक नाही📝?

🔰   माहिती अधिकार अधिनियम, २००५ या अधिनियमात मध्ये माहिती म्हणजे काय ?

सर्वप्रथम माहिती अधिकारात कोणती माहिती आपण संबंधित प्राधिकरणाकडे मागू शकतो ते पाहूयात, दस्तऐवज, अभिप्राय, प्रकाशने, परिपत्रके आदेश, रोजवह्या, अहवाल, नमुने, प्रतिमाने, कंत्राटे ई-मेल, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण करण्यात आलेले अभिलेख, कोणत्याही खाजगी संस्थेची एखाद्या शासकीय प्राधिकरणाकडून मिळू शकणारी माहिती आपण माहिती अधिकारात माहिती मागवू शकतो.

🔰  राज्य जन माहिती अधिकार यावर कोणती माहिती देणे बंधनकारक नसते ?

१. भारताचे सार्वभौमत्व व अखंडता या संदर्भात ची माहिती.

२. आर्थिक हितसंबंधांची माहिती.

३. राष्ट्रीय सुरक्षेची माहिती.

४. अपराध्यास चेतावणी देणारी माहिती.

५. न्यायालयाकडून मनाई केलेली माहिती.

६. संसदेच्या किंवा राज्य विधानमंडळाच्या विशेषाधिकारांचा भंग होईल अशी माहिती.

७. वाणिज्यक क्षेत्रातील माहिती.

८. व्यापार विषयक गुपितांची माहिती.

९. त्रयस्थ पक्षाची माहिती.

१०. कोणत्याही व्यक्तीच्या सुरक्षितता धोक्यात येईल या संदर्भातील माहिती.

११. खटला दाखल करण्यासाठी अडथळा येईल अशी माहिती.

१२. एखाद्या व्यक्तीच्या खाजगीपणाचे विनाकारण उल्लंघन करणारी माहिती.
                                                      "Right To Information"

🔰 राज्य जन माहिती अधिकाऱ्याने माहिती फेटाळताना काय करावे ?

सर्वप्रथम राज्याने माहिती अधिकाऱ्याने नमुना–क अर्ज फेटाळण्याच्या सूचना संदर्भित अर्जदारास सांगण्यात याव्यात माहिती अधिकार अधिनियम २००५ मधील ज्या कलमाद्वारे माहिती नाकारण्यात आली आहे त्याचे कलम कळविण्यात यावे. किंवा ज्या कारणासाठी पण माहिती अधिकारा मध्ये माहिती फेटाळत आहोत त्याचे कारण द्यावे त्याच्याखाली असे लिहावे की हे हे पत्र मिळाले पासून दिवसाच्या आत आपण प्रथम अपीलीय अधिकारी यांच्याकडे अपील करू शकता नमुना-क मध्ये प्रथम अपीलीय अधिकारी यांचा पत्ता व नाव याची सविस्तर माहिती देण्यात यावी. 



 Promoted Content : 

🔴 माहिती अधिकार अधिनियम, २००५ अशा पद्धतीने काम करतो.

🔴 असा दाखल करा मोबाईल वरून माहिती अधिकार अर्ज आणि आपणास हवी असणारी माहिती मिळवा.

🔴  राज्य जन माहिती अधिकारी कोणती माहिती फेटाळू शकतात ?

🔴  राज्य जन माहिती अधिकारी त्रयस्थ पक्षाची माहिती देऊ शकतो का ? 

🔴  माहिती अधिकारात मागण्यात आलेल्या माहितीचा मजकूर कसा असावा.

🔴  राज्य जन माहिती अधिकारी याकडे अन्य शासकीय प्राधिकरणाची माहिती मागण्यास काय करावे?

🔴 राज्य जन माहिती अधिकारी शुल्क भरणे बाबत अर्जदारास कसे कळवतात.

🔴 माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अन्वये माहिती मिळण्याबाबतच्या अर्जाचा नमुना ।भाग२ YouTube Video। 

🔴  माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ याच्या कलम १९(१) अन्वेय अपील।भाग३। YouTube Video। 


Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post