वारणानगर (प्रतिनिधी) ता.२४ : वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वैज्ञानिक प्रयोग, प्रश्नमंजुषा आणि गमतिदार - प्रबोधन पर वैज्ञानिक खेळ या बरोबरच चमत्कारिक प्रयोगांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
जागतिक वसुंधरा दिन आणि भौतिकशास्त्र दिनानिमित्त डॉ. एस. जे. लादे, डॉ. विलास पाटील, प्रा. अविनाश लाडगावकर, भालचंद्र शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये 30 हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. विजेते अनुक्रमे असे- वैभव नलवडे व संघ (बी.एस्सी.३), गुरुदास पाटील व संघ (बी.एस्सी. २), सौरभ राजाराम मायंदे व संघ (बी.एस्सी.३) तर भूगोल विभागात डॉ. प्रकाश राऊत, डॉ.आर. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेते संघ आणि वर्ग अनुक्रमे असे- अंकिता पाटील, स्वप्नाली पाटील, महेश सपकाळ (सर्व बी. ए. भाग ३), हर्षदा साळसकर, अमृता कोडोलकर , संतोषी पातळे(सर्व बी. ए. भाग १), नम्रता डोंबे, सानिका पवार, शिल्पा खामकर (सर्व बी. ए. भाग 2).
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर होते. या वेळी बोलताना प्राचार्य डॉ. चिकुर्डेकर म्हणाले की, " संपूर्ण जगाने मानव कल्याणासाठी सामंजस्याने एक- दूसर्यासाठी मदत आणि सहकार्याची भूमिका घ्यावी. युद्धासारख्या विषयाला सर्व राष्ट्रांनी आणि जाती धर्माच्या प्रमुखांनी एकत्र येऊन वसुंधरा वाचवण्यासाठी एक होण्याचे आवाहन करून ते म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा मानव कल्याणासाठी उपयोग व्हावा. सर्व विज्ञानाच्या शाखांनी एकत्र येऊन हवा, पाणी, नैसर्गिक ऊर्जा स्त्रोतांचा व साधनसंपत्ती चा उपयोग समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवला पाहिजे." 🔴वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय मध्ये एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या निमित्ताने विविध स्पर्धां मध्ये विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व शैक्षणिक भेट वस्तूंचे प्राचार्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. विविध स्पर्धांसाठी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे- सावकर, प्रशासकीय अधिकारी प्रा.डॉ. वासंती रासम यांनी शुभेच्छा दिल्या.
Promoted Content :