पन्हाळागडाचे संवर्धन लवकरात लवकर करावे : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने निवेदन

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
 

पन्हाळा / प्रतिनिधी : महाराष्ट्रातील गडदुर्गांची झालेली दयनीय अवस्था, पुरातत्व विभागाने गडदुर्गांकडे, ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, समाधी याकडे केलेले दुर्लक्ष, तसेच दिवसेंदिवस गडदुर्गांचे भंग होणारे पावित्र्य यावर प्रशासनाने पर्याय काढावा, गडदूर्गांचे अस्तित्व आणि पावित्र्य जपावे अशा विविध मागण्यांसाठी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूर जिल्हा वतीने श्रीपन्हाळगडावरील पुरातत्त्व विभाग कार्यालय, तहसीलदार कार्यालय, नगरपरिषद कार्यालय यांना निवेदन देण्यात आले. नरवीर श्री शिवा काशीद यांच्या समाधीस्थळापासून भगवा ध्वजाचे पूजन करून गडावरून शेकडो धारकर्यांच्या उपस्थितीत फेरी काढण्यात आली. केलेल्या मागण्यांवर विचार करून त्वरीत पाठपुरावा न केल्यास हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत जाईल असा इशाराही देण्यात आला.

यावेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे कोल्हापूर जिल्हा कार्यवाह श्री.सुरेशराव यादव आण्णा, श्री.नितीनराव चव्हाण, नरवीर श्री.शिवा काशीद यांचे थेट वंशज श्री.आनंदराव काशीद, श्री.शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान जिल्हा प्रवक्ता श्री अभिनंदनराव सोळांकुरे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पन्हाळा तालुका प्रमुख श्री.रोहितराव पाटील, दशरथ शिंदे भुयेवाडी समस्थ शेकडो धारकरी तसेच मोडीलिपी परिवार, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


 Promoted Content : 

🔴 माहिती अधिकार अधिनियम, २००५ अशा पद्धतीने काम करतो.

🔴 असा दाखल करा मोबाईल वरून माहिती अधिकार अर्ज आणि आपणास हवी असणारी माहिती मिळवा.

🔴 अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिया कशी असते. Engineering Diploma Admission Process ?

🔴 आय.टी.आय क्षेत्रात करिअर केल्यावर मिळेल चांगल्या पगाराची नोकरी...

🔴 निसर्गाचा आनंद : अनाबेला अग्रो टुरिझम, असळज. ता : गगनबावडा, जि : कोल्हापूर.



Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post