यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये एम.बी.ए. नंतरच्या करियर संधी या कार्यशाळेला तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय warananagar

वारणानगर, येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये एम बी ए नंतर च्या करिअर संधी या विषयावर आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शक डॉ सागर सुतार यांचे संदर्भ ग्रंथ भेट देऊन सत्कार करताना प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर. सोबत डॉ. सी. आर. जाधव, प्रा.आर. बी. बसनाईक.

वारणानगर (प्रतिनिधी) : वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागाच्यावतीने 'एम.बी.ए. नंतरच्या करियर संधी' या विषयावरती कार्यशाळा आणि व्याख्यानाला तीनशेहून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवून उस्फूर्त प्रतिसाद दिला. वाठार येथील अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट च्या एमबीएचे विभागप्रमुख डॉ. सागर सुतार यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर होते.

डॉ. सुतार म्हणाले की,"एम. बी. ए. पदवी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये एच.आर.ए., वित्तीय विश्लेषक, व्यवस्थापन व्यवस्थापक, विपणन व्यवस्थापक अशा विविध नोकरी आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर म्हणाले, आजच्या २१ व्या शतकामध्ये व्यवस्थापन ही काळाची गरज बनली आहे, आज प्रत्येक गोष्टीचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. व्यवस्थापन ही एक कला असून त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी  व्यवस्थापनातील  पदवीचे शिक्षण आणि ज्ञान आत्मसात  केले पाहिजे. 

वाणिज्य विभागप्रमुख प्रा. रोहित बसनाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. प्रवीण सातवेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सोनाली हिरवे यांनी संयोजन सहाय्य केले.आभार डॉ. चंद्रकांत जाधव यांनी मानले. 


Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post