" कृतीशील कार्यशाळा आयोजित करून घरा घरात विज्ञान पोहचवू - आमदार डॉ. विनय कोरे (सावकर)... "
वारणानगर (प्रतिनिधी) ता.२६ : श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित वारणा विज्ञान केंद्राच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी 'टाकाऊ पासून वैज्ञानिक खेळणी' या विषयावरील दोन दिवसीय कृतीशील कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या प्रचंड उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी आईसर पुणे येथिल सायन्स टीचिंग असोसिएट श्री. अशोक रुपनर हे तज्ञ प्रशिक्षक म्हणून लाभले...
कोरोनानंतर ऑफ-लाइन पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेमध्ये जिल्ह्यातील विविध शाळांमधून ६० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्युत चुंबकीय ऊर्जा, प्रकाश, ध्वनी या विषयातील विविध संकल्पनांवर आधारित २५ हून अधिक प्रकारची वैज्ञानिक खेळणी स्वत: तयार केली आणि विविध संकल्पना प्रात्यक्षिकांतून अवगत केल्या...
प्रत्यक्ष कृतीतून केलेल्या प्रयोगांमुळे विज्ञान आणि गणित सहज सोप्या पद्धतीने शिकता येत असून ते कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहते. त्यामुळे अशा कार्यशाळा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व शाळांतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी भविष्यात वारणा विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित करणार असल्याचे आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी यावेळी सांगितले...
यापुढील काळात विज्ञान प्रसार आणि प्रचार जोमाने करणार असल्याचं वारणा सायन्स सेंटरचे प्रिन्सिपल कोऑर्डिनेटर डॉ. जॉन डिसोझा यांनी सांगितले. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी सायंटिफिक ऑफिसर प्रितेश लोले तसेच विद्यासेवक आणि विद्यार्थी प्रतिनिधींनी विशेष प्रयत्न केले...
Promoted Content :
🔴चित्रकार - शिल्पकारांची राजर्षी शाहू महाराजांना अभूतपूर्व मानवंदना.
🔴 वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये जागतिक वसुंधरा दिनानिमित्त प्रदर्शनाचे आयोजन.
🔴 तुम्हाला मोबाईल वरून पैसे मिळवायचे आहेत ?
🔴 तुम्हाला ऑनलाईन पैसे मिळवायचे असतील तर हा लेख एकदा वाचाच..
🔴 शेअर मार्केट म्हणजे नक्की आहे तरी काय.