कोल्हापूर येथे पावनखिंड चित्रपटातील कलाकारांची आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी भेट घेतली...

पावनखिंड टीम सोबत आमदार डॉ. विनय कोरे (सावकर)


कोल्हापूर येथे पावनखिंड चित्रपटातील कलाकारांची आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी भेट घेतली... 

कोल्हापुर (प्रतिनिधी) : घोडखिंडीत बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरत पराक्रमाची शर्थ केली होती. बाजीप्रभूंच्या पवित्र रक्तानं पावन झाल्यानं या खिंडीला पुढं ‘पावनखिंड’ नाव पडलं. शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘पावनखिंड’ चित्रपटात मांडली आहे... बाजीप्रभू देशपांडे, त्यांच्यासोबत प्राणप्रणाने लढणारे रायाजीराव बांदल (अंकित मोहन), कोयाजीराव बांदल (अक्षय वाघमारे), बहिर्जी नाईक (हरिश दुधाडे), सरनोबत नेताजी पालकर (विक्रम गायकवाड), श्रीमंत शंभूसिंह जाधवराव (बिपीन सुर्वे), फुलाजीप्रभू देशपांडे (सुनील जाधव), हरप्या (शिवराज वायचळ), गंगाधरपंत (वैभव मांगले) आणि महाराजांसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा नरवीर शिवा काशीद (अजिंक्य ननावरे) या सर्व शिलेदारांची आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी भेट घेतली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या...

 पावनखिंड चित्रपटातील सर्व कलाकारांचे काम कौतुकास्पद - आमदार डॉ. विनय कोरे (सावकर)...



























Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post