Header Add

Parle-G तुमच्या लाडक्या बिस्किटाची गोष्ट.

 Parle-G 

वयाच्या अठराव्या वर्षी मोहनलाल दयाल (चौहान) यांनी गारमेंट व्यवसाय सुरू केला होता मुंबईचा विलेपार्ले उपनगर मध्ये ते राहत होते त्यांनी सन १९२९  मध्ये पार्ले नावाची कंपनी सुरू केली त्यामध्ये ते केक, पेस्टी, कुकीज, Orange Candy चॉकलेट बनवत होते. सन १९३९ मध्ये पार्ले प्रोडक्शसने  बिस्किटाची निर्मिती करण्यास सुरुवात केली.
मुंबईचा इरला-पारला या उपनगरांमध्ये एका जुन्या कंपनीची जागा विकत घेऊन स्वदेशी चळवळ ने प्रेरित झालेले व्यापारी मोहनलाल दयाल (चौहान) यांनी घरातील लोकांच्या आणि मित्रांच्या मदतीने १९२९  मध्ये पार्ले कंपनी ची सुरुवात केली.त्यावेळी कंपनीमध्ये बारा लोकांच्या मदतीने पहिल प्रॉडक्ट ऑरेंज कँडी बाजारात आणले.
                                                               

स्वातंत्र्य पूर्वीच्या काळात सामान्य माणसांना ही बिस्किटाचा आस्वाद घेता यावा यामध्ये ग्लुकोज ही जास्त असावा आणि तिने ही सर्वसामान्य माणसांना परवडणारे असावे असा विचार करून   मोहनलाल दयाल (चौहान) कुटुंबीयांनी १९३९ साली कंपनीमध्ये बिस्किटाची निर्मिती केली त्याच वर्षी बिजनेसला अधिकृत नाव मिळाले पारले प्रोडक्टस प्रायव्हेट लिमिटेड देण्यात आलं त्यावेळी पार्ले बिस्कीटचं नाव पार्ले ग्लुको होतं कमी किंमत आणि चांगली गुणवत्ता दिल्यामुळे कंपनीची लोकप्रियता वाढली.
१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अचानक भारतात गव्हाचा तुटवडा जाणवला कंपनी हे बिस्किट गव्हापासून बनवत असल्याने  कंपनीला पार्ले ग्लुको बिस्किटांच उत्पादन थांबावावे लागले कालांतराने पुन्हा कंपनीचे उत्पादन सुरू केलं.
पण १९८० च्या काळात ग्लुको हे नाव धारण करणारे अनेक बिस्किट बाजारात आल्यामुळे पार्ले ग्लुकोज नाव पार्ले-जी असे ठेवण्यात आलं लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी पिवळ्या रंगाच्या आकर्षक दिसणाऱ्या पुड्यावरील लहान मुलगी चे चित्र काढण्यात आले.

पारले च्या पुड्या वरील लहान मुलगी कोण ?
याबाबत श्री मयंक शहा पार्ले कंपनीचे प्रोडक्ट हेड यांनी असे सांगितले की, हे एक काल्पनिक पात्र आहे एव्हरेस्ट क्रिएटिव्ह कंपनीचे मगनलाल दहिया संचालक यांनी पार्ले गर्लचा मार्केट्स डिझाइन केलं आहे सन १९६० पासून पार्लेकर लही कंपनीच्या प्रत्येक झाली चा भाग आहे.

पार्ले जी बद्दल थोडक्यात...
१.सन २०१३ मध्ये रिटेल बाजारात पाच हजार कोटींहून अधिक उलाढाल केली.
२.पार्ले-जी देशात ४२ क्रमांकावर आहे.
३. पार्ले कंपनीचे हे बिस्किट नेल्सन सर्वेक्षणानुसार सन २०११ मध्ये जागतिक सर्वात मोठी बिस्किटाची ब्रँड आहे.
४. भारताचा पहिला एफएमसीजी ब्रँड बनला.
 Promoted Content : 

🔴  कोल्हापुर मधील पहिला टेक-स्टार्टअप 

🔴 | Cafe Parisian, Kodoli |

🔴 तुळस शेती करून मिळवा लाखोंचे उत्पन्न...

🔴 "वारणेची फेमस बटू भेळ..." मराठी माणसाची अस्सल मराठमोळी चव.
Post a Comment

0 Comments