शेतकरी अमर पाटील. |
"रिलायन्स फाऊंडेशनची माहिती सेवा ऊस उत्पादक शेतकर्यांना ठरत आहे हक्काचे वाढीव उत्पादनाचे साधन.. बानगे येथील अमर पाटील या शेतकऱ्यांने 22 गुंठ्यांत ऊसाचे घेतले 45 टन विक्रमी उत्पादन."
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील हवामान ऊस पिकासाठी पोषक असल्यामुळे येथील शेतकरी प्रामुख्याने ऊस शेती करतात.मात्र बहुतांशी शेतकऱ्यांना पारंपरिक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचे भरघोस उत्पादन कसे घ्यावे ? या विषयी योग्य वेळी मार्गदर्शन मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत म्हणावे तसे ऊसाचे किफायतशीर असे उत्पादन मिळत नाही.परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील बानगे (ता.कागल ) येथील शेतकरी अमर लक्ष्मण पाटील या शेतकऱ्यांने रिलायन्स फौंडेशनच्या व्ही. एम. एस .सेवा,ऑडिओ कॉन्फरन्स, व्हाट्सअप ग्रुप, तसेच 1800-419-8800 या टोल फ्री क्रमांकाचा वापर करून मिळालेल्या माहितीचा उपयोग आपल्या ऊसशेतीत केला.त्यांनी उसाचे विक्रमी असे उत्पादन घेतले आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या विविध शेती विषयक मोफत सेवेमुळे अमर पाटील यांनी 22 गुंठ्यांत दुप्पट 45 टन ऊसाचे उत्पादन घेतले आहे. यामधून त्याना (1,35,000 ) रुपये मिळाले आहेत.पाटील रिलायन्स फाऊंडेशनच्या संपर्कात येण्यापूर्वी 22 गुंठ्यात फक्त 20 टन ऊसाचे उत्पादन मिळत होते.त्याना 60000 रुपये हजार रुपये मिळाले होते.
अमर लक्ष्मण पाटील हे शेतकरी ,बाणगे ता.कागल जि. कोल्हापूर येथे पत्नी मुलां सोबत राहतात. त्यांनी 3.5 एकर शेती भाडे तत्वावरती घेतली आहे.यामध्ये ते ऊस व सोयाबीन हे पीक घेतात. ऊस हे प्रमुख पीक घेतात.अमर पाटील ऊस शेती जुन्या पद्धतीने म्हणजे पारंपरिक पद्धतीने करत होते.ऊसाची सरी 3 फुट सोडत होते.ऊस बीज प्रक्रिया विषयी माहिती मिळत नव्हती. ऊस लागण करताना दाट ऊस लागण करत होते. दोन रोपात योग्य अंतर ठेवत नव्हते.ऊसामध्ये सरीत तुडुंब भरून पाट पाणी देत होते. अमर पाटील यांचे अनावश्यक असे पाणी नियोजन होते.कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. याची माहिती नव्हती.हवामान माहिती नव्हती यामुळे त्याना उत्पन्न घेताना अडचणी येत होत्या.ऊसाची लागण करण्याची पद्धत व बियाणाची निवड कशी करावी हे माहीत नव्हते. अमर्याद रासायनिक खते वापरत होते.सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करत नव्हते. एकंदरीत अमर पाटील यांना ऊस शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान माहिती नव्हते. यामुळे पाटील यांना ऊस शेती करताना उत्पादन खर्च व नफा याचा ताळमेळ बसत नव्हता. ऊस शेतीतून फायदा होत नव्हता. ऊस शेती करताना अमर पाटील निराश होते.
अमर पाटील हे शेतकरी रिलायन्स फाउंडेशनच्या प्रतींनिधी द्वारा ऑनलाइन कार्यक्रमामध्ये 2018 पासून सहभागी झाले आहेत.. त्यानंतर खोडवा पीक व्यवस्थापन, उसाचे वखत व्यवस्थापन, उस लागवडी पूर्व नियोजन, कीड व रोग व्यवस्थापन , उस लागवडीचे पूर्वमशागत कशी करावी. या विषयावरती रिलायन्स फाउंडेशनच्या कॉन्फरन्स मध्ये सहभागी होत होते.तसेच रिलायन्स फाउंडेशनच्या व्हाट्स अप्प कार्यक्रमामध्ये 10 ते 12 वेळा सहभागी झाले आहेत. गेली अडीच वर्षे अमर पाटील रिलायन्सच्या मोफत व्हाईस मेसेज (VMS) सेवेचा लाभार्थी आहेत. पाटील यांना हवामानाची माहिती खत व्यवस्थापन व संभाव्य येणाऱ्या किडीची रोगाची माहिती मिळाली. किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या औषधाची फवारणी करावी याची माहिती मिळत होती.यामध्ये शेती तज्ञ डॉ. अशोकराव पिसाळ यांचे मार्गदर्शन मिळाले. या कार्यक्रमामध्ये अमर पाटील यांना ऊसशेती व्यवसाय फायदेशीर आहे. याची माहिती मिळाली.
अमर पाटील यांना रिलायन्स फौंडेशनद्वारे उस पिकाची मशागत करताना शेणखत व कंपोस्ट खताचा वापर करणे, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवण्यासाठी उपाय योजना राबवल्या.उस पिकाला खत टाकण्याच्या वेळा म्हणजे चार हप्त्यामद्धे देणे गरजेचे आहे याची माहिती मिळाली.ऊसाच्या सरीतील साडेचार फुट सरी पडणे दोन रोपातील अंतर ठेवायचे हे समजले. हुमणी नियंत्रण करण्यासाठी मेटाराईझम बुरशीचा वापर केला.पंपाला 50 ग्रॅम प्रमाणे प्रमाण केले.बीज प्रक्रिया करताना जैविक व रासायनिक पध्दतीने बिजप्रक्रिया केली. नत्र – 140 किलो , स्फुरद – 70 किलो , पालश – 70 किलो तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य अशा प्रकारे रासायनिक खताची मात्रा द्यावी लागते बयाची माहिती मिळाली.पिकाच्या आवश्यकतेनुसार सरी पद्धतीने पाणी दिले.उस स्पेशियल , बोरॉन याची फवारणी घेतली आहे. तसेच करपा किंवा तांबेरा रोगासाठी बावीस्टीन आणि क्लोरोपायरीफोस या कीटक नाशकाची आवश्यकतेनुसार फवारणी केल्या.रिलायन्स फाऊंडेशनच्या शेती विषयक वेगवेगळ्या विनामूल्य सेवेचा उपयोग अमर पाटील यांनी 22 गुंठे ऊस शेतीत करून घेतला .यामुळे अमर पाटील यांना 22 गुंठ्यात 45 टन ऊसाचे दुप्पट उत्पादन झाले आहे.यामधून पाटील यांना प्रति टन 3000 रुपये प्रमाणे 1,35,000 हजार रुपये मिळाले आहेत.तसेच त्यांचा एकरी उत्पादन खर्च 22,000 हजार रुपये आला.रिलायन्स फाऊंडेशनच्या संपर्कात येण्यापूर्वी अमर पाटील यांना 22 गुंठ्यात 20 टन उसाचे उत्पादन मिळत होते. प्रति टन 3000 रुपये प्रमाणे त्याना 60000 मिळाले होते. शिवाय एकरी 22,000 हजार उत्पादन खर्च सुद्धा जास्त येत होता.अमर पाटील यांना रिलायन्स फाउंडेशनच्या कृषी विषयक वेगवेगळ्या सेवेमुळे ऊसाचे उत्पादन वाढून फायदा झाला आहे.
अमर पाटील यांनी रिलायन्स फौंडेशनच्या सर्व सेवेचे आभार मानले आहेत. तसेच ते इतर शेतकर्यांनी या सेवेचा लाभ घेऊन आपले शेतीचे उत्पादन वाढवावे असे सांगत आहेत. तसेच मित्रानाही रिलायन्स फाउंडेशन सेवेची माहिती सांगत आहेत. पाटील कृषि विभाग व रिलायन्स फाउंडेशन यांची माहिती कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, राधांनगरी, हातकणंगले तालुक्यातील हजारों शेतकर्यांपर्यंत माहिती पोहचवत आहेत व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
Promoted Content :
🔴 Organic Jaggery सेंद्रिय गुळ कसा तयार होतो.
🔴 ऊस शेती ऊस रोपे लागण करण्याची पद्धत.
🔴 फायदेशीर मुक्त संचार गोठा पद्धत.
🔴 दुध व्यवसायातुन महिन्याला पन्नास हजार उत्पन्न : भोलासाहेब चौगले.
🔴 खडतर प्रवासातून जे.के.रोपवाटीकेने गाठले यशाचे शिखर.