WhatsApp ग्रुप च्या माध्यमातून दिगवडे गावात तरुण करत आहेत वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन.
दिगवडे |
पन्हाळा
(प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील छोटसं पण टुमदार गाव
म्हणजे दिगवडे. गावच्या तिन्ही बाजूने काठोकाठ वाहणारी कासारी नदी असल्यामुळे या
गावाला कमालीचे निसर्ग सौंदर्य लाभले आहे.याच सौंदर्यात भर पडावी व सामाजिक
बांधिलकी जपली जावी यासाठी या गावचे जावई सुनिल शिंदे (कोल्हापूर) यांनी गावाच्या
सुरुवातीलाच असणाऱ्या तळ्याशेजारी लावण्यासाठी वेगवेगळ्या जातीची ३० झाडे उपलब्ध करून दिली. ती जगवण्याची जबाबदारी
गावातल्या तरुणाईने घेतली आणि ती लीलया पेलली सुद्धा. या तरुणांनी वृक्षसंवर्धन
म्हणून एक व्हाट्सएप ग्रुप तयार केला व जे तरुण पाणी घालण्यासाठी इच्छुक आहेत
त्यात त्यांना ऍड केले. २० सप्टेंबर २०२१ रोजी
लागवड करण्यात आलेल्या वृक्षांना दर रविवारी सकाळी ७ वाजता नियोजनबद्धरित्या पाणी
घालण्यात येते. ही प्रक्रिया आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे. गावातीलच एक प्रतिष्ठित
नागरिक विष्णू शिंदे यांनी त्यांचा वाढदिवसानिमित्त आणखी झाडे देऊन भर घातली. सदरील
सर्व झाडे व्यवस्थित जगली आहेत व मोठी होत आहेत. सध्या जी झाडे लावण्यात आली आहेत
त्यांना संरक्षक जाळ्यांची गरज असून आणखी झाडे अजून भर पडण्याची आवश्यकता आहे. आणि
प्रत्येक रविवारी झाडांना पाणी
घालण्यासाठी संग्राम पाटील, शुभम शिंदे, सुमित पाटील, उद्देश पाटील, प्रतिक जाधव, यांचे
सहकार्य लाभते असे सागर पाटील यांनी
सांगितले. व तसेच गावाच्या सुरुवातीला असणाऱ्या तळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी
ग्रामपंचायत प्रशासनाने निधी उपलब्ध करावा अशी मागणी तरुण वर्गातून होत आहे.
🔴 गाथा धेयवेड्या माणसांची | रायगडचे वारकरी |
दिगवडे गावात वृक्ष संवर्धनासाठी व वृक्ष लागवडीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
🔴 गरूड भरारी उगवता तारा : सुनील आनंदा नवाळे.
🔴 ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी सरिता ताई ह्या एक प्रेरणादायी उदाहरण.