सातबारा आणि आठ अ चा नक्की फायदा काय ? सातबारा आणि आठ अ च्या नोंदी कश्या घालतात.

सातबारा आणि आठ अ चा फायदा काय ? सातबारा आणि आठ अ च्या नोंदी कश्या घालतात. 

सातबारा आणि आठ अ च्या नोंदी कश्या घालतात.


सातबारा उतारा म्हणजे काय ?

शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे जमिनीवरील मालकी हक्काचा जो उतारा दिला जातो त्यास सातबारा उतारा चे म्हणतात.

सातबारा उतारा असल्याचा फायदा

१.प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्याजागी मिळू शकतो.
२. सातबारा हा जमिनी मालकी हक्काचा प्राथमिक व अंतिम पुरावा आहे.

सातबाराच्या नोंदी
गावाचा नमुना नंबर सात आणि गावचा नमुना नंबर बारा मिळून सातबारा उतारा तयार होतो.

गाव नमुना सातमध्ये पुढील नोंदी असतात :

भूमापन क्रमांक,भूमापन क्रमांकाचा उपविभाग,भूधारणा पद्धत, भोगवटदाराचे नाव,खाते क्रमांक,शेती स्थानिक नाव,लागवड योग्य क्षेत्र एकूण हेक्टर आर मध्ये, भोगवटदार वर्ग,कुळाचे नाव,खंड,इतर अधिकार,पोटखराब (लागवडीयोग्य नसलेले क्षेत्र) वर्ग अ,वर्ग ब,एकूण आकारणी,जूडी किंवा विशेष आकारणी,सीमा आणि भूमापन चिन्हे.

गाव नमुना बारा मध्ये पुढील नोंदी असतात :

पिकाखालील क्षेत्रांचा तपशील,मिश्र पिका खालील क्षेत्र,निर्भळ पिकाखालील क्षेत्र, लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन,घटक पिके व प्रत्येका खालील क्षेत्र,वर्ष,हंगाम,मिश्रणाचा संकेत क्रमांक,जल सिंचित,अजल सिंचित,पिकाचे नाव,जलसिंचन,अजलसिंचन, पिकाचे नाव,जलसिंचन,अजलसिंचन स्वरूप,क्षेत्र,जलसिंचनाचे मापन,शेरा.

आठ अ उतारा म्हणजे काय ?

एका व्यक्तीच्या नावावर एकूण कोणकोणत्या गटातील किती जमीन आहे हे दर्शविणारा उतारा म्हणजे आठ अ उतारा होय.

आठ अ उतारा असल्याचा फायदा

१.गावात व्यक्तीच्या वेगवेगळ्या गटातील जमीन एकाच उतारावर दिसते.

२. जमिनीचे हक्क वैयक्तिक आहेत की सामूहिक तसेच जमीन नेमकी कोणाच्या नावे आहे हे समजते.

३. कर्ज काढण्यासाठी आठ अ उतारा उपयोगी होतो.

आठ अ च्या नोंदी

गाव नमुना आठ अ मध्ये पुढील नोंदी असतात.

खाते क्रमांक,नाव,गाव नमुना सहा मधील नोंद,भूमापन क्रमांक ब पोट हिस्सा क्रमांक, क्षेत्र,वसुलीसाठी, आकारणी किंवा जुडी,दुमाला जमीन वरील नुकसान,स्थानिक उपकर,एकूण.

सात-बारा आणि आठ अ उतारा मधील फरक.

एखाद्या व्यक्तीच्या नावे एका गटात जमीन किती आहे की सातबारा उतारा दिसते तसेच गावात एका व्यक्तीच्या नावे आणि गट असतील तर त्याची संपूर्ण माहिती ही आठ अ उतारा वर मिळते.


🔴 WhatsApp ग्रुप च्या माध्यमातून दिगवडे गावात तरुण करत आहेत वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन


Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post