वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाची गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त

वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाची गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त. 

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगर
विद्यार्थ्यांचा सत्कार करताना  प्रा.डॉ. प्रकाश चिकुर्डेकर.

वारणानगर (प्रतिनिधी) : ता.पन्हाळा, वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाची गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये घेण्यात आलेल्या विद्यापीठ स्तरावरील परीक्षेत गुणवत्ता प्राप्त केल्याबद्दल रुपये ५००० ते १०००० पर्यंत प्रत्येकी रोख खात्यावरती रक्कम जमा करण्यात आली  आहे. शिवाय गुणवत्ता प्रमाणपत्र ही विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले आहे. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे- सावकर, प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम, प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पदवी स्तरावर गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रत्येकी रक्कम रुपये ५००० व प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थी अनुक्रमे असे- समीक्षा दळवी, कल्याणी पाटील. (बी.ए.भाग-१), शरयू पाटील (बी.ए. भाग-२) प्रतिक्षा उगळे (बी.कॉम भाग-२) तर पदव्युत्तर विभाग- प्रत्येकी रक्कम रुपये १०००० व गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त विध्यार्थी असे - सौरभ झेंडे (एम.ए. भाग-१ इतिहास), तर सायली पाटील (एम.एस्सी. भाग-१ रसायनशास्त्र).


"5G नेमकं आहे तरी काय ? मोबाईल मध्ये लवकरच 5G Network ची क्रांती…!"


Promoted Content :



🔴  कोल्हापूरची झणझणीत सुप्रसिद्ध शिव मिसळ | Shiv Misal Kolhapur |


Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post