5G नेमकं आहे तरी काय ? मोबाईल मध्ये लवकरच 5G Network ची क्रांती…!

 मोबाईल मध्ये लवकरच 5G Network ची क्रांती…!

5G नेमकं आहे तरी काय ?  मोबाईल मध्ये लवकरच 5G Network ची क्रांती…!
5G Network 

सर्वात प्रथम G चा अर्थ काय आहे हे समजून घेऊयात. G चा अर्थ आहे Generation (जनरेशन) म्हणून एखादा नवीन फोन लॉन्च झाला की नेक्स्ट जनरेशन चा फोन आहे असे म्हटले जाते. वायरलेस फोन नंतर 1G सर्वात पहिली जनरेशन होती.

आता पाहुयात जनरेशनचा  प्रवास 

1G सन १९८० मध्ये अमेरिकेत आलं त्याचं स्पीड २.४kbps होत ते अनलॉक सिग्नल चा वापर करत होते.

2G सन १९९१ मध्ये GSM टेक्नॉलॉजीवर आधारित होते त्याच स्पीड ६४kbps होते त्याचा वापर फिनलँड मध्ये पहिल्यांदा केला.

3G सन २००० मध्ये तंत्रज्ञान आलं त्यामुळे फाईल पाठवणे, व्हिडीओ कॉलिंग करणे सोपे झाले.

4G सन २०११ मध्ये लॉन्च झाले आणि प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसू लागले त्या साली स्मार्टफोन वापर खऱ्या अर्थाने लोक करू लागले.

5G हे म्हणजे मोबाईलचे पाचवे जनरेशन आहे. यामध्ये वेगवान नेटवर्क, स्पीड,अखंडित एचडी सर्फिंग उत्कृष्ट सेवा अशा बऱ्याच सेवा आपणास या द्वारे मिळणार आहेत.लवकरच मुंबईसह देशातील मोठ्या शहरांमध्ये 5G नेट्वक सुरु  केले जाणार आहे असे दूरसंचार विभागाने स्पष्ट केले आहे.

🔴  ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी सरिता ताई ह्या एक प्रेरणादायी उदाहरण.

5G नेमकं काय आहे त्यामुळे नक्की काय बदलेल ?

● 5G जनरेशन हे फास्ट मोबाईल नेटवर्क चे काम करेल.

● 5G जनरेशन मोबाईल वरून आपण तीन तासाचा एचडी चित्रपट एका सेकंदापेक्षाही कमी वेळेत डाऊनलोड करू शकतो.

व्हिडिओ बफरींग चा त्रास होणार नाही.

● 5G जनरेशन मध्ये एका मिलीसेकंदापेक्षाही कमी वेळात माहितीची देवाणघेवाण करता येणार आहे.

● 5G नेटवर्कमुळे शहरे सहज रित्या तोडली जातील.

कनेक्टेड स्मार्ट सिरीज

मशीन टू मशीन कम्युनिकेशन

सेल्फ ड्रायव्हिंग कार

इंटरनेट ऑफ थिंग्स

5G भारतात कधी येईल.

भारतात 5G चाचणी गेल्या दोन वर्षापासून सुरु आहेत. भारतीय एअरटेल, दूरसंचार ऑपरेटर, वोडाफोन-आयडिया, रिलायन्स जियो. आदींनी बेंगलुरू, कोलकत्ता, गुरुग्राम, चंदीगड, गांधीनगर, मुंबई, दिल्ली, पुणे जामनगर, लखनौ, अहमदाबाद, हैदराबाद, चैन्नई येथे 5G ची चाचणी स्थापन केलेल्या आहेत. सर्वात आधी 5G मुंबई, गुरुग्राम, बंगळूरू, कोलकत्ता, दिल्ली, अहमदाबाद, अनो पुण्याला 5G ची मिळेल. त्यासाठी मार्च- एप्रिलमध्ये स्पेक्ट्रम लिलाव जाहीर होईल. त्यानंतर सेवा सुरु होईल, असे दूरसंचार विभागाने स्पष्ट केले आहे. 



Promoted Content :



🔴  कोल्हापूरची झणझणीत सुप्रसिद्ध शिव मिसळ | Shiv Misal Kolhapur |






Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post