Children Vaccination in Kolhapur : वारणानगरमध्ये 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरूवात

कोडोली ता. पन्हाळा येथे १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना कोरोना लसीकरणास सुरवात...


पन्हाळा तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा - आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी केले आवाहन..

         कोरोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन या विषाणूचा वेगाने प्रसार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण आजपासून सुरू झाले आहे. पन्हाळा तालुक्यात १४,३६८ येवढे पात्र लाभार्थी आहेत आज कोडोली हायस्कुल, कोडोली येथे लसीकरणाचा शुभांरभ आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. २००७ मध्ये किंवा त्यापूर्वी जन्मलेली सर्व मुले कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी पात्र आहेत, अशी माहिती पन्हाळा तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिली.

         यावेळी ॲड. राजेंद्र पाटील - प्रवक्ते जनसुराज्य शक्ती पक्ष, वैशाली पाटील - सभापती पंचायत समिती पन्हाळा, गितादेवी पाटील - सदस्य पंचायत समिती पन्हाळा, डॉ. विनोद मोरे - पन्हाळा तालुका आरोग्य अधिकारी, एम. बी. बोरगे - प्राचार्य कोडोली हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, डॉ. निनाद कुलकर्णी - वैद्यकिय अधिकारी प्रा.आ.केंद्र केखले, एस.वी.पांडव - विस्तार अधिकारी पन्हाळा, एस. बी. चौगुले विस्तार अधिकारी पन्हाळा व पदाधिकारी, आरोग्यसेवक स्टाफ, शिक्षक स्टाफ, विद्यार्थी उपस्थित होते.


 Promoted Content :

∎ कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेची पंचवार्षिक निवडणुक सन २०२१-२०२६ छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या वतीने पन्हाळा तालुक्यातील  ठरावधारकांचा वारणानगर येथे मेळावा संपन्न.

 पीएम किसान योजनेसाठी e KYC कशी करायची ? 










Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post