पीएम किसान योजनेसाठी e KYC कशी करायची ?

 पीएम किसान योजनेसाठी ई e-KYC कशी करायची ? 

पीएम किसान योजनेसाठी e KYC कशी करायची


१.      e-KYC म्हणजे काय?

·        एखाद्या व्यक्तीची ओळख इलेक्ट्रोनिकली पडताळून पाहणे म्हणजे की केवायसी होय.

    e - Electronic

     K - Know

     Y - Your

     C - Client

२.      e-KYC शेतकऱ्यांनी न केल्यास काय होणार?

·     पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या दहाव्या हप्ता हा e-KYC  न करता मिळणार आहे. परंतु भविष्यात ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे कारण मार्च २०२२ नंतरचे हप्ते मिळवायचे असतील तर मार्च २०२२ पर्यंत e-KYC  करणे आवश्यक आहे.

३.      e-KYC करण्याच्या पद्धती.

·        स्वताच्या मोबाईल वरून.स्वताच्या मोबाईल वरून.

·        आपल्या जवळच्या CSC  सेंटर मध्ये जाऊन.

४.      स्वताच्या मोबाईल वरून e-KYC कशी करायची ?

·  सर्वप्रथम Google वरती जाऊन https://www.pmkisan.gov.in असं टायपिंग करायचा आहे.

·    त्यानंतर आपल्या समोर भारत सरकारची कृषी एवं किसान कल्याण मंत्रालय ही वेबसाइट ओपन होईल त्या वेबसाईटच्या उजव्या बाजूला फार्मर कॉर्नर (Farmers Corner) या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

·    त्यामध्ये e-KYC नावाच्या पर्यायावर क्लिक केल्यावर आधार नंबर प्रमाणीकरणाचे पेज आपल्या समोर ओपन होईल.

·    त्यामध्ये आधार क्रमांक त्या बॉक्समध्ये आपला आधार क्रमांक टाकायचा आहे.तसेच टेक्स्ट कोड घालून सर्च केल्यानंतर तुम्हाला आधार कार्डशी लिंक असणारा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे.

·       आधार कार्डशी लिकं असणारा मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.

·      तो ओटीपी क्रमांक टाकून सबमिट केल्यानंतर तुम्हाला e-KYC is successfully submitted म्हणून आपणास संदेश प्राप्त होईल.

शेतकऱ्यांने e-KYC प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर P M-KISAN योजनेमध्ये सत्यापित शेतकरी म्हणून गणला  जाईल. 

SHIVPARVATI VASTRA NIKETAN, SHUBHKARYALY, CHIKURDE

  SHIVPARVATI VASTRA NIKETAN, SHUBHKARYALY, CHIKURDE   


 Promoted Content 



Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post