ज्ञानगंगा कार्यक्रमांतर्गत रिलायन्स फाउंडेशन आणि पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जनावरांनांसाठी वंध्यत्व निवारण व तपासणी शिबीर संपन्न...

ज्ञानगंगा कार्यक्रमांतर्गत रिलायन्स फाउंडेशन आणि पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने  जनावरांनांसाठी वंध्यत्व निवारण व तपासणी शिबीर संपन्न...

रिलायन्स फाउंडेशन व  पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर

             रिलायन्स फाउंडेशन व  पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्यावतीने कुरुकली, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथे जनावरांचे वंध्यत्व निवारण व तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरामध्ये शेतकऱ्यांच्या गाय व म्हैस या जनावरांच्या काळामध्ये समस्या माजावर न येणे गाबन न राहणे याविषयी तपासणी व औषध उपचार करण्यात आले तसेच मस्टाटीज या रोगाविषयी तपासणी व उपचार करण्यात आले तसेच या रोगा संबंधित माहिती शेतकऱ्यांना डॉक्टरांच्या कडून पशुपालकांना देण्यात आली जनावरांचा भाकड काळ कमी करण्याविषयी उपचार करण्यात आले या शिबिरामध्ये सुमारे कुत्रा, बैल, म्हैस , गाय, वासरू व शेळ्या अशा एकूण 230 यांच्यावर प्राथमिक आरोग्य तपासणी आणि वंधत्व निवरणाचे उपचार करण्यात आले तसेच जनावरांना दूध वाढीसाठी आवश्यक कॅलशियमच्या बॉटल मोफत देण्यात आल्या . इतर जनावरांना जंत नाशक औषधे देण्यात आले. 


        अशा प्रकारे रिलायन्स फाउंडेशन कडून वेळोवेळी पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या मदतीने पशुपालकांसाठी व शेतकर्‍यांसाठी शिबीरे घेण्यात येतात. या शिबिरासाठी वैद्यकीय टिम म्हणून डॉ. विनोद पवार जिल्हा पसुसंवर्धन अधिकारी जि. प. कोल्हापूर ,डॉ. सचिन पाटील ,यांनी जनावरांना वंध्यत्व तपासणी व उपचार करण्यात आले. 

➤ जातिवंत जनावरांची निवड कशी करावी ?

        तसेच डॉ. विनोद पवार ,डॉ. सचिन पाटील यांनी हिवाळ्यातील जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन या विषयी सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील, कुरुकली गावामध्ये या वंध्यत्व तपासणी व निवारण शिबिर या शिबिरामद्धे 55 पशुपालक सहभागी झाले होते. व 230 जनावरांना उपचार करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये रिल्यानस फाऊंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक मारुती खडके व नवनाथ माने, आणि कुरुकली गावातील पशुपालक उपस्थित होते.



Promoted Content :


➤  फायदेशीर मुक्त संचार गोठा पद्धत.

➤ जातिवंत जनावरांची निवड कशी करावी ?







Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post