निसर्गाच्या कुशीतील डेस्टिनेशन : आठवण मातीची रिसॉर्ट माले
आठवण मातीची रिसॉर्ट हे वाघबिळ घाट रांगेजवळ आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले एक आलिशान होमस्टे आहे, जिथे हिरवीगार टेकड्या आणि निसर्ग सौंदर्याने आपल्याला वेढलेले आहे.आठवण मातीची रिसॉर्ट वाघबिळ घाटापासून फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे, आणि कोल्हापूर-रत्नागिरी मुख्य रस्त्यावर वसलेले आहे. हिरव्या टेकड्या आणि शेतांनी वेढलेले हे ठिकाण आहे जिथे ग्रामीण आणि आधुनिकतेचा खरा संगम दिसून येतो.
आज-कालच्या धावपळीच्या युगात, प्रत्येकाचे जीवन धकाधकीने भरलेले असते. शहरामधील धकाधगीच्या जीवनापासून दूर जाण्यासाठी, आणि गोंगाटाने भरलेल्या शहराच्या प्रदूषणापासून दूर आपल्या नियमित जीवनातून एक ब्रेक घेणेसाठी आठवण मातीची रिसॉर्टच्या इको-फ्रेंडली फार्म स्टेमध्ये आपला आंनदमय दिवस घालवा. निसर्गाचं तुमच्यासोबत असणं इतकं सुंदर आहे की तुम्हाला दुसऱ्या कशाची गरजच नाही. या ठिकाणी शरीर, मन आणि आत्मा पुनरुज्जीवित करण्यासाठी या आणि शांततेचा आनंद घ्या. शांत आणि रमणीय परिसरात वसलेले, निसर्गाच्या सान्निध्यात हे ठिकाण तुमचे दुसरे घरच आहे. हा रिसॉर्ट आधुनिक आलिशान सुविधांचा आणि पन्हाळा तालुक्यातील पारंपरिक सौंदर्याचा उत्कृष्ट संगम आहे. इथे फक्त निसर्गाचा वारा आणि पक्ष्यांची किलबिलच तुमच्या शांततेत खंड पाडू शकतो. हिरवळीने नटलेले निसर्गदृश्य आणि वर आकाशाचा निळाशार पडदा यामध्ये तुम्हाला निसर्गाच्या संगीताचा अनुभव घेता येईल.
![]() |
आठवण मातीची रिसॉर्ट, पन्हाळा - पारंपरिक सौंदर्य आणि आधुनिक सोय |
पन्हाळ्याचे आकर्षण – आठवण मातीची रिसॉर्टचा अनोखा अनुभव
आजच्या काळात आपल्या प्रत्येकाचंच जीवन इतकं धकाधकीचं झालंय कि कधी कधी श्वास घ्यायलाही उसंत नाही असं वाटतं ही धावपळ तर आपण टाळू शकत नाही पण आपले सुट्टीचे दिवस साधून असं काही अनुभवू शकतो कि नव्या तजेल्याने ऊर्जने आपण आपल्या कामावर परतू शकू अशाच विलक्षण अनुभवासाठी आपल्या करिता आम्ही खुलं केलंय आठवण मातीची रिसॉर्ट…
- रमाकांत चौगले
पर्यटकांचे आवडते ठिकाण – आठवण मातीची रिसॉर्ट
सर्व आधुनिक सोयीसुविधा देणारं पण आपल्या मातीची आठवण करून देणारं आपलं रिसॉर्ट आपल्या पुढच्या पिढीला फक्त इंटरनेवर पाहून माहिती असणारं कृषीजीवन प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याचा अनुभव देणारं आणि आपल्या विरंगुळ्याला गावाकडच्या अनुभवानी समुद्ध श्रीमंत करणारं आहे नक्की कसं ते पाहण्यासाठी मात्र इथे एकदा भेट द्या…
- शशिकांत चौगले.
![]() |
मनमोहक हरित निसर्ग आणि शांत वातावरण |
![]() |
शांतता, सौंदर्य आणि आल्हाददायक वातावरण |
तुम्ही प्रत्यक्षात येवून आठवण मातीची रिसॉर्टच्या मोहात पडावे तेही तुमच्या आवडत्या लोकांसोबत तुमच्या लाडक्या लोकांसोबत तुम्हाला एक शांत आणि सुंदर विकेंड हवा असल्यास अथवा एखादा खास प्रसंग साजरा करायचा असल्यास तुमच्यासाठी उत्तम पर्याय एकच आठवण मातीची रिसॉर्ट माले तर मग आजच बुकिंग करा.
आजच बुकिंगसाठी कॉल करा :
+९१ ८६६९९२५७४१
+९१ ८६६९९२५७४२
athavanmatich@gmail.com
![]() |
संपूर्ण विश्रांतीसाठी एक अद्वितीय ठिकाण |
आठवण मातीची रिसॉर्ट जाफळे फाटा (जखीन माळ) माले ता.पन्हाळा,जि.कोल्हापूर निसर्ग,अलिशान अनुभव आणि आपण घालवलेली आनंदी गोष्ट तसेच आपला अनुभव comment मध्ये आम्हाला नक्की सांगा.
निसर्ग सौंदर्य आणि आधुनिक सोयी यांचा सुरेख संगम