पुण्यातील प्राध्यापकाची नोकरी सोडून महाराष्ट्रासह कर्नाटक मध्ये सुरु केल्या शाहू आरोग्यदायी गुळाचा चहा च्या शाखा.

पुण्यातील प्राध्यापकाची नोकरी सोडून महाराष्ट्रासह कर्नाटक मध्ये सुरु केल्या शाहू आरोग्यदायी गुळाचा चहा च्या शाखा.

शाहू आरोग्यदायी गुळाचा चहा वारणानगर

शाहू आरोग्यदायी गुळाचा चहा,
वेळ असो काही, गरजेचा असतो तो चहा,
वाजले असू देत सहा किंवा मग राञीचे दहा.
रूचकर, चविष्ट व उत्तम आरोग्याकरीता,
शाहू आरोग्यदायी गुळाचाच चहा हवा.
एकदा चव घेऊन तर पाहा.

           महाराष्ट्रात तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथे प्रथमच ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज असलेला शाहू आरोग्यदायी गुळाचा चहा. शाहू आरोग्यदायी गुळाचा चहा या व्यवसायासाची स्थापना २९ नोव्हेंबर २०२० रोजी सत्यजित बबन हुजरे रा. नवे पारगावता. हातकणंगलेजि. कोल्हापूर यांनी केली.

              सत्यजित यांचा जन्म ३० जुलै १९९६ रोजी झाला. सत्यजित यांनी M.Sc. FOOD SCIENCE AND TECHNOLOGY हे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून, त्यांनी पुण्यामध्ये प्राध्यापकाची नोकरीही केली. सत्यजित यांना नोकरी पेक्षा व्यवसायातच करियर करायचं होतं आणि म्हणूनच त्यांनी पुण्यामधील प्राध्यापकाची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्याच गावातआपल्याच जिल्ह्यात राहून इतरांपेक्षा वेगळा आणि अनोखा व्यवसाय सुरू करण्याचा निश्चय केला. सत्यजित यांनी शाहू आरोग्यदायी गुळाचा चहा वारणा कॉलेज गेट समोरवारणानगरकोल्हापूर येथे त्यांची पहिली शाखा  साकारली. ह्या यामध्ये सत्यजित हे गुळाचा चहाब्लॅक टीलेमन टीग्रीन टीगुळाची कॉफीगुळाची कोल्ड  कॉफी इत्यादी प्रकारची दर्जेदार उत्पादने देतात. सत्यजित हे शाहू आरोग्यदायी गुळाचा चहा या फर्म चे संस्थापक म्हणून सध्या कार्यरत आहेत. 

             सत्यजित सरांच्या महाराष्ट्र सह कर्नाटकात अनेक शाखा आहेत. मूर्ती लहान पण किर्ती महान या उक्तीला सत्यजित सरांनी सार्थ ठरविले आहे. पुण्यातील प्राध्यापकाची नोकरी सोडून गुळाच्या चहाचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. सत्यजित सरांचा गुळाच्या चहाच्या व्यवसायासोबतच सामाजिक योगदानामध्येही खारीचा वाटा असलेला आपल्याला पहावयास मिळतो. सत्यजित सरांनी अनेक गरीब गरजूंना फ्रेंचायसीच्या माध्यमातून व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली आहे.  

शाहू आरोग्यदायी गुळाचा चहा

सत्यजित यांच्या महाराष्ट्रासह कर्नाटकात अनेक शाखा आहेत. मूर्ती लहान पण किर्ती महान या उक्तीला सत्यजित यांनी सार्थ ठरविले आहे. पुण्यातील प्राध्यापकाची नोकरी सोडून गुळाच्या चहाचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. सत्यजित यांच्या गुळाच्या चहाच्या व्यवसायासोबतच सामाजिक योगदानामध्येही खारीचा वाटा असलेला आपल्याला पहावयास मिळतो. सत्यजित यांनी अनेक गरीब गरजूंना फ्रेंचायसीच्या माध्यमातून व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली आहे,  कोल्हापूर जिल्ह्यातील ही संकल्पना राबवणारे ते पहिले व्यक्ति आहेत. सत्यजित यांनी कमी वयातच आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आपल्या जिद्दीलाकष्टाला व प्रामाणिकपणाला  सातत्यपूर्ण प्रयत्नांची साथ असली की यशाचे शिखर आपणास प्राप्त होतेच होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सत्यजित बबन हुजरे हे आहेत. सत्यजित यांची अशीच सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात प्रगती व्हावी ही सदिच्छा. शाहू आरोग्यदायी गुळाचा चहा या व्यवसायाच्या  अधिक   माहितीसाठी आणि फ्रेंचायसीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावरती संपर्क साधावा.

शाहू आरोग्यदायी गुळाचा चहावारणा कॉलेज गेट समोरवारणानगरकोल्हापूर.

संपर्क : ८८५५९३६८३८

e-Mail : satyajeet50hujare@gmail.com


 promoted content : 

🔴 वारणा खोऱ्यातील खवय्यांची प्रथम पसंती असणारे हॉटेल रेणुका , वारणानगर  

🔴 असा दाखल करा मोबाईल वरून माहिती अधिकार अर्ज  आणि आपणास हवी असणारी माहिती मिळवा.

🔴 काखे गावात मुलगी सासरी जाताना आठवण म्हणून माहेरी झाड वृक्षारोपण.

🔴  वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते || सहकार महर्षि स्वर्गीय तात्यासाहेब कोरे. ||

🔴 जाखलेच्या आजीने भर माळरानावरच अडविली आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांची गाडी...


1 Comments

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post