यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाला महाविद्यालय समृद्ध ग्रंथालय योजना उपक्रमाअंतर्गत १५ हजार रुपये कींमतीचे ग्रंथ ग्रंथालयासाठी प्राप्त झाले आहेत.


वारणानगर (प्रतिनिधी) : वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाला केंद्रीय हिंदी निदेशालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या कडून  अहिंदी भाषा क्षेत्रात कार्यरत महाविद्यालय समृद्ध ग्रंथालय योजना, मोफत संदर्भ ग्रंथ उपक्रमाअंतर्गत १५ हजार रुपये किंमतीचे २९ ग्रंथ हिंदी विभाग आणि ग्रंथालयासाठी प्राप्त झाले आहेत. या बद्दल आणि हिंदी विभागाच्या सातत्यपूर्ण कामकाजासाठी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आ. डॉ.विनय कोरे- सावकर, प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. वासंती रासम यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. 

गत शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी विशेष प्रयत्न करून केंद्रीय हिंदी निदेशालयाला प्रस्ताव सादर केला होता. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर हिंदी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी कार्यरत व्यक्ती- संस्थांना निदेशालया ने अत्यंत दुर्मिळ, संशोधन परक आणि उपयुक्त असे २९  हिंदी ग्रंथ मोफत पाठवून दिले आहेत. प्राप्त ग्रंथांमध्ये पौराणिक, संशोधन, समीक्षात्मक, कादंबरी, बोधकथा, महाकाव्य, व्याकरण भाषाविज्ञान इत्यादी विविध विषयावरील संदर्भ ग्रंथांचा समावेश आहे. याकामी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या समन्वयक व हिंदी भाषेतील प्रसिद्ध लेखिका डॉ. विदुषी शर्मा - दिल्ली, वितरण विभागाच्या सहाय्यक निदेशक एच. सी. मीणा यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. 


प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी ग्रंथालय शास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम.जी. शिंदे यांच्याकडे  प्राप्त ग्रंथ सुपूर्त केले. यावेळी महाविद्यालयाचे प्रबंधक बाळासाहेब लाडगावकर उपस्थित होते. 



 Promoted Content : 

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post