तात्यासाहेब कोरे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी दिनकर लक्ष्मण भोसले यांची निवड

" संस्थेची सण २०२२-२७ ची पंचवार्षिक निवडणूक सलग ५ व्यांदा बिनविरोध "

वारणानगर (प्रतिनिधी) : बहिरेवाडी ता.पन्हाळा येथील मा. एच.आर. जाधव (आण्णा) उद्योग समुहातील श्री.तात्यासाहेब कोरे विकास सेवा संस्था मर्यादित बहिरेवाडी संस्थेची सण २०२२-२७ ची पंचवार्षिक निवडणूक सलग ५ व्यांदा बिनविरोध झाली. तसेच संस्थेच्या चेअरमनपदी दिनकर लक्ष्मण भोसले यांची तर व्हा.चेअरमनपदी दत्ता बिरु माने यांची निवड झाली. ही निवडणूक आमदार डाॅ विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व वारणा दुध संघाचे उपाध्यक्ष एच.आर जाधव (आण्णा) यांच्या नेतृत्वात पार पडली. यावेळी बिनविरोध नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला.

आमदार डाॅ.विनय कोरे (सावकर) यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची उत्कृष्ट कामगिरी - एच.आर जाधव (आण्णा) यांचे प्रतिपादन..!

यावेळी बहिरेवाडी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच शिरीषकुमार जाधव यांच्यासह नवनिर्वाचित बिनविरोध संचालक, हरी जाधव (बापू), बाळासो जमदाडे, प्रताप जाधव,पंडित कावळे, बळवंत येवले, कृष्णात जाधव, संपत जाधव, पोपट पाडळकर, वसंत कावळे, श्रीमंती भोसले, अनिता भोई, सचिव भगवान पाटील. निवडणूक अधिकारी पी एन कदम, मंगसुळेसो, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. आभार गुणवंतराव बिरंबोळे सर यांनी मानले.



  Promoted Content  :   



Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post