वारणा साखर कारखाना बिनविरोध झालेबद्दल पारगांव , बहिरेवाडी व आसपासच्या परिसरातील शेतकरी सभासदांचा स्नेह मेळावा संपन्न...

 

श्री. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लि.. वारणानगर सभासद स्नेह मेळावा.

पन्हाळा(प्रतिनिधी) : श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या नवे/जुने पारगांव, चावरे, अंबप, तळसंदे, पाडळी, मनपाडळे, निलेवाडी, शिये, भुये, भुयेवाडी, जठारवाडी, केर्ली, बहिरेवाडी, जाखले, केखले, पोखले व माले या कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांचा आज स्नेह मेळावा आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत पार पडला. श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याला केखले गावातून १००% ऊस पाठवून सर्व शेतकरी सभासंदानी मोलाचे सहकार्य केले असे आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी सभासदांशी स्नेह मेळाव्यात बोलताना सांगितले.

"महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीच्या इतिहासात सर्वात जास्त विज निर्मिती करणारा यावर्षी वारणा साखर कारखाना असेल - आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांची माहिती"

यावेळी श्री तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रतापराव पाटील, वारणा दूध संघाचे व्हा. चेअरमन एच. आर. जाधव, वारणा बॅकेचे व्हा. चेअरमन उत्तम पाटील, वारणा कारखाना संचालक रावसो पाटील, श्रीनिवास डोईजड, शहाजी पाटील, सुभाष पाटील, सुभाष जाधव, उदय पाटील, सुभाष पाटील, रविंद्र जाधव, प्रदीप तोडकर, डॉ. प्रताप पाटील, शामराव पाटील, किशोर जाधव, काकासो चव्हाण, विजय पाटील, संदीप जाधव, विजय धनवडे, सुभाष कणसे, सौ. रंजना पाटील, सौ. वैशाली पाटील, कार्यकारी तज्ञ संचालक एन. एच. पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते व सरचिटणीस ॲड. राजेंद्र पाटील व कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद उपस्थित होते.




 Promoted Content : 

🔴 कोल्हापूर येथे पावनखिंड चित्रपटातील कलाकारांची आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी भेट घेतली...

🔴 खडतर प्रवासातून जे.के.रोपवाटीकेने गाठले यशाचे शिखर.






Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post